Royal Entertainmentटॉप पोस्ट

शाहरूखचा चाहत्यांना ईद का तोफा, झिरोचा टीझर रिलीज

0

शाहरूख खानचा या वर्षीचा मोस्ट अवेटेड ‘झिरो’ या चित्रपटाचा टीझर आला असुन, यामध्ये सलमान खान सुध्दा दिसून येत आहे. सलमान या चित्रपटात नसला तरी दोघांचे एक गाणे तरी चाहत्यांना नक्कीच पाहायला मिळणार आहे. दोन्ही खानच्या चाहत्यांसाठी हा ईद का तोफा असणार आहे.

टीझरमध्ये शाहरूख खान एका वेगळ्याच रूपात दिसून येत आहे. तो टीझरमध्ये बवुआ सिंग नावाच्या बुटक्याच्या रूपात दिसतोय. या आधी झिरोचा टीझर 1 जानेवारीला रिलीज झाला होता.

Loading...

या चित्रपटात शाहरूख खानबरोबर कॅटरिना कैफ व अनुष्का शर्मा यांच्या देखील प्रमुख भुमिका असणार आहेत. तिघाही जणांनी याआधी यश चोप्राच्या ‘जब तक है जान’ या चित्रपटात काम केले आहे.

झिरोचे डायरेक्टर आंनद एल राय हे आहेत. त्यांनी या आधी रांझना, तनू वेड्स मनू या सारखे चित्रपट डायरेक्ट केले आहेत. गौरी खानची रेड चिलीज इंटरटेनमेंट व आंनद एल राय यांची कलर य़ेलो प्रोडक्शन हे या चित्रपटाचे प्रोड्युसर आहेत. तसेच अजय-्अतुल यांचे या चित्रपटाला म्युजिक असणार आहे.

हा चित्रपट 21 डिंसेबरला सर्वत्र रिलीज होणार आहे.

(PHOTO INPUT :- FACEBOOK/IAMSRK)

Loading...

आंध्रप्रदेश सरकारचा निर्णय; राज्य ‘गांजामुक्त’ करण्याचा निर्धार

Previous article

अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान मोदींना पत्र, आयएएस अधिकार्‍यांचा संप मागे घेण्याची मागणी

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *