मुख्य बातम्या

तुम्ही लवकरच पुन्हा लढताना दिसाल ; आव्हाडांचं एकनाथ शिंदे यांच्यासाठी खास ट्वीट

0

राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना करोनाची लागण झाली आहे. शिंदे यांना करोना झाल्याचं समजताच मंत्रिमंडळातील त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही एक ट्वीट करत शिंदे यांना लवकर बरे व्हा, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
एका जागी बसण्याचा त्यांचा स्वभाव नाही. त्यामुळं ते पुढील काही दिवसातच ते आपल्यामध्ये करोना विरुद्धची लढाई लढताना दिसतील,’ असा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. ‘लवकर बरे व्हा,’ अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत.

मंत्रीमंडळातील माझे लढवय्ये सहकारी मा. ना. श्री. एकनाथ शिंदे हे कोरोनाग्रस्त झाल्याचे कळले. एका जागी बसण्याचा त्यांचा स्वभाव नसल्याने मला खात्री आहे कि ते पुढील काही दिवसातच आपल्यामध्ये कोरोना विरुद्धची लढाई लढताना दिसतील.
लवकर बरेव् हा हीच शुभेच्छा[email protected] @DrSEShinde
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 24, 2020

राज्य सरकारमधील मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडतानाच ते आपल्या मतदारसंघातही सक्रिय होते. त्यातून ते अनेकांच्या संपर्कात आले होते. खबरदारी म्हणून त्यांनी बुधवारी ‘कोविड १९’ ची चाचणी करून घेतली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांनी स्वत: ट्वीट करून काल ही माहिती दिली. त्यानंतर अनेक सहकाऱ्यांनी त्यांना प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला ; अहमदनगर महानगरपालिकेत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र
सिनेसृष्टीला मोठा धक्का : ज्येष्ठ पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे निधन !
राज्य सरकार म्हणजे केवळ सत्तेला चिकटून बसलेले सरकार आहे
आता पुण्यातील कोरोनाचा भार हिरकणींच्या खांद्यावर !
चिंतेत वाढ : गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे १९,१६४ रुग्ण वाढले
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. तुम्ही लवकरच पुन्हा लढताना दिसाल ; आव्हाडांचं एकनाथ शिंदे यांच्यासाठी खास ट्वीट InShorts Marathi.

कपलचा होईल खपल चॅलेंज ; सायबर पोलिसांकडून कपल्सना सावधानतेचा इशारा

Previous article

मराठा आरक्षणावर राजकारण नको , ठाकरे सरकारला आम्ही सहकार्य करू – देवेंद्र फडणवीस

Next article

You may also like

Comments

Comments are closed.