मुख्य बातम्या

“होय, मी ड्रग्ज घेतले” ; रिया चक्रवर्तीची NCBच्या चौकशीत मोठी कबुली

0

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर पुढील तपास एनसीबीकडे (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ) सोपवण्यात आला आहे. बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी सुशांतसिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीसह अन्य आरोपींना एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे.
आता एनसीबीच्या चौकशीदरम्यान रिया चक्रवर्तीने ड्रग्ज सेवन केल्याची कबुली दिल्याची माहिती आहे.एनसीबीने विचारलेल्या 55 व्या प्रश्नाचे उत्तर देताना रियाने ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली.
एनसीबी अधिकाऱ्यांनी “जर तू ड्रग्जचे सेवन करत नसशील, तर तू ड्रग्ज तस्कर आहेस आणि हाही एक भयंकर गुन्हाच आहे” असे दटावल्यानंतर रियाने आपण ड्रग्जचे सेवन केल्याची कबुली दिली आहे.
दरम्यान, अभिनेत्री रिया चक्रवर्तीला 22 सप्टेंबरपर्यंत भायखळ्याच्या तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीने ड्रग्ज कनेक्शनमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला बॉलिवूडमधील 25 कलाकारांची यादी दिल्याची धक्कादायक माहिती आहे
महत्वाच्या बातम्या :-

त्या’ अभिनेत्रीचं नाव घ्यायची तिची लायकी नाही ; कंगनावरून गृहमंत्री संतापले
‘पोलिस अधिकाऱ्यांकडूनच सरकार पाडण्याचा प्रयत्न’ , गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचा मोठा गौप्यस्फोट
मराठा आरक्षणाच्या १३% जागा रिक्त ठेवून पोलीस भरती करावी ; विनायक मेटेंची मागणी
कंगना राणावतला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही ; गृहमंत्री संतापले
अनिल देशमुखांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार आहे का ?

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. “होय, मी ड्रग्ज घेतले” ; रिया चक्रवर्तीची NCBच्या चौकशीत मोठी कबुली InShorts Marathi.

#MeToo – पायल घोषचा पुन्हा एकदा अनुरागवर निशाणा

Previous article

कोरोनाचा हैदोस ! केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला समज , चाचण्या वाढवा नाहीतर…

Next article

You may also like

Comments

Comments are closed.