Royal politicsटॉप पोस्ट

का म्हणाले यशवंत सिन्हा की, पूर्वी मी लायक मुलाचा नालायक पिता होतो, परंतू आता…जाऊन घ्या काय आहे कारण

0

माजी भाजप नेते आणि अर्थ मंत्री यशवंत सिन्हा यांनी पुन्हा आपल्या मुलाला म्हणजेच केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांना फटकारले आहे. जयंत सिन्हा यांनी नवे गुण उधळले असे त्यांचे म्हणणे आहे. जयंत सिन्हा यांनी चक्क आरोपींचा सत्कार केला असल्याने यशवंत सिन्हा यांनी त्याच्यावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.  ही घटना नक्की आहे काय हे कळल्यावर तुम्ही सुद्धा चकित व्हाल.

झाला असा की, गोरक्षांच्या नावाखाली एका व्यापार्‍याची निर्घृण हत्या केल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकारांतील 8 आरोपींचा सत्कार केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी केला. या प्रकाराचे फोटोस सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.  या करणारे यशवंत सिन्हा यांनी जयंत सिन्हा यांच्या खरमरीत समाचार घेतला.

Loading...

या बद्दलचे ट्विट करीत ते म्हणाले की, “या पूर्वी मी लायक मुलाचा नालायक बाप होतो, आता भूमिका बदलली आहे. मी माझ्या मुलाच्या या कृत्याचे समर्थन करीत नाही.” असे बोलत जयंत सिन्हा यांच्यावर त्यांनी चांगलेच ताशेरे ओढले.

मागील वर्षी जून महिन्यात रामगड येथे अलीमुद्दीन अन्सारी या जनावरांचा व्यापार करणार्‍या व्यापार्‍याला निर्घृणपणे ठार मारले होते. गोरक्षणाच्या नावाखाली 8 जणांकडून ही हत्या करण्यात आली होती. याच आरोपींनाचा सत्कार करतानाचे फोटो सोशल मीडियावर  व्हायरल झाल्यामुळे जयंत सिन्हा याच्यावर जोरदार टीका झाली.

रांची उच्च न्यायलयाने या 8 आरोपींवरील भरण्यात आलेला खटला काही काळासाठी थांबवला असून सध्या त्यांना जामीनावर मुक्त केले आहे.

फोटो सोशल मीडियावर  व्हायरल झाल्यानंतर जयंत सिन्हा यांना आपल्या केलेल्या कृत्याची सारवासारव करण्याची वेळ आली, उच्च न्यायालयाने त्यांना जामीनावर मुक्त केले आहे. त्यामुळे मी जे काही केले ते कायद्याचा मान राखून आदर करून  केले आहे.माझ्यावर कारण नसताना टीका केली जात आहे.

याआधी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणावर माजी भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री यांनी सडकून  टीका होती, तर जयंत सिन्हा यांनी सरकारच्या धोरणांचे समर्थन केले होते. यावेळी देखील यशवंत सिन्हा यांनी जयंत सिन्हा यांच्यावर टीका केली होती.

यशवंत सिन्हा यांनी एप्रिल महिन्यातच भाजप ला रामराम ठोकला आहे आणि राष्ट्रमंच नावाची नवी संघटना उभारली आहे. तसेच यांनी नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पंतप्रधान मोदींवर कायमच जोरदार टीका केली आहे. देशात लोकशाही धोक्यात आहे असे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.  ते माजी पंतप्रधान अटलबिहारी  वाजपेयी यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते.

Loading...

सभेत शेतकर्‍यांवर बंदी आणि मोदी म्हणतायेत माझा अजेंडा विकास आणि फक्त विकास

Previous article

ज्ञानेश्वर महाराज्यांच्या पालखीत सेवा देणार्‍या ‘त्या’ अश्वाचा मृत्यू

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *