Royal Entertainmentमुख्य बातम्या

या सुप्रसिद्ध मराठी कलाकारांचा झाला आहे घटस्फोट, पाहून तुम्ही पण चकित व्हाल

0

सई ताम्हणकर आणि अमेय गोसावी यांचे 15 डिसेंबर 2013 रोजी लग्न झाले होते. अमेय हा देखील चित्रपटाच्या निर्मितीत सामील आहे
आणि तो असून निर्माता त्याची लोडिंग पिक्चर्स नावाची कंपनी आहे. सई आणि अमेय एकाच क्षेत्रातील असले
तरी त्यांनी कधीही एकत्र काम केले नाही.सई आणि अमय या दोघांनी प्रेम विवाह केला होता,
त्यांचे तीन वर्षांनंतर लग्न झाले, पण काही कारणास्तव दोघांचे घटस्फोट झाले, ही साईच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी होती, सईने अद्याप लग्न केले नाही.

अभिनेता स्वप्नील जोशी यांचे 2005 मध्ये अपर्णा जोशी सोबत प्रेम विवाह झाला होता,
पण काही कारणास्तव २०११ मध्ये त्यां दोघांचा घटस्फोट झाला. २०११ मध्ये स्वप्निल जोशीने
लीना आराध्याशी लग्न केले. स्वप्निल आणि लीना यांना आता माहेर नावाची एक मुलगी आहे.

बिग बॉसची प्रसिद्ध मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचे अमेय निपांकर यांच्याशी लग्न झाले होते,
पण त्यांचे नाते जास्त काळ टिकले नाही, लग्नाच्या काही दिवसानंतर तिचा घटस्फोट झाला,
शर्मिष्ठा ने तेजस देसाई ह्या उद्योगपती शी नुकताच विवाह केला आहे. ती सध्या “सुखांच्या सरांनी हे मन बावरे”
ह्या मालिकेत एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे.

बिग बॉसची मराठी फेम अभिनेत्री रुपाली भोसले यांनी २०१२ मध्ये मिलिंद शिंदेशी
लग्न केले होते, परंतु काही कारणास्तव त्यांचेही घटस्फोट झाले. अभिनेत्री रुपाली भोसले
आता अंकित मगरे यांना डेट करत आहे. ती अंकितला डेट करत असल्याचे स्वतः रुपालीने उघड केले होते.

प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी प्रधान आणि अभिनेता शशांक केतकर यांनी ही होणार सून मी ह्या घरची ह्या
मालिकेच्या यशानंतर लग्न केले होते. परंतु शशांक केतकर आणि तेजस्विनी यांच्यातील मतभेदांमुळे काही
दिवसांतच त्यांचा घटस्फोट झाला. अभिनेता शशांक केतकरने 2017 मध्ये प्रियांका धवलसोबत दुसरे लग्न केले.
तेजस्विनी प्रधान मात्र अजून हि सिंगल आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेता महेश मांजरेकर यांचे ही घटस्फोट झाले आहे,
त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव दीपा होते, त्यानंतर त्यांनी दुसरे लग्न अभिनेत्री मीना मांजरेकरशी केले.

अग बाई सासूबाई मालिकेतील अभिनेते गिरीश ओक यांचेही वास्तविक जीवनात दोनदा लग्न झाले आहे,
गिरीशच्या पहिल्या पत्नीचे नाव पद्मश्री पाठक होते, पद्मश्री पाठक यांच्या मुलीचे नाव गिरीजा आहे,
ती एक चांगली मराठी अभिनेत्री देखील आहे. अभिनेत्री गिरीश ओक यांनी पल्लवी ओक यांच्याशी
दुसरे लग्न केले, असून त्यांना आता एक लहान मुलगी देखील आहे.

अभिनेता पीयूष रानडे ह्याचे सुद्धा वास्तविक जीवनात दोनदा लग्नही झाले आहे. त्यांच्या पहिल्या
पत्नीचे नाव शाल्मली टोळे आहे. पीयूष आणि शाल्मली यांचे 2010 मध्ये लग्न झाले होते.
चार वर्षानंतर 2014 मध्ये दोघे वेगळे झाले. अस्मिता या मालिकेच्या सेटवर पीयूष आणि
मयुरीची भेट झाली, ही भेट एका प्रेम प्रकरणात बदलली आहे.

बिग बॉस मराठी चित्रपटाची अभिनेत्री स्मिता गोंदकर यांनी सिद्धार्थ भाटियाशी लग्न केले,
पण त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि काही दिवसातच ते वेगळे झाले. बिग बॉस मराठी
चित्रपटाची अभिनेत्री रेशीम फडणीस हिने प्रसिद्ध अभिनेता संजूशेठबरोबर लग्न केले होते. 11 वर्षे एकत्र राहिल्यानंतर
त्यांनी 2004 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता रेशीम संजय किट्टीकर यांना डेट करत आहे.

The post या सुप्रसिद्ध मराठी कलाकारांचा झाला आहे घटस्फोट, पाहून तुम्ही पण चकित व्हाल appeared first on Live Marathi Batamya.

90 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्ठी गाजवणाऱ्या ”या” प्रसिद्ध अभिनेत्री आज करतात हे काम, ही अभिनेत्री तर…

Previous article

संवेदनशील आणि निखळ हास्याची व्याख्या म्हणजे “स्मिता पाटील”

Next article

You may also like

Comments

Comments are closed.