Royal Entertainmentमुख्य बातम्या

या दिशेला असेल घराचा दरवाजा तर नेहीच राहते घरात सुख समृद्धी

0

वास्तु पुरुषाच्या 32 पदांमधून ही कडी पश्चिम दिशेच्या 17 ते 24 पदांपर्यंत आधारित आहे. यामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार की पश्चिम दिशेमध्ये कोणत्या ठिकाणी दरवाजा असल्यावर काय फायदा आणि काय नुकसान होवू शकते. ज्योतिषाचार्य पं. शिवकुमार यांच्यानुसार वास्तूच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
पश्चिम दिशेचे पहिले पद आहे आणि यास पितृ म्हणले जाते. अशा पदावर दरवाजा असल्यास घरातून गरिबी जात नाही. कुटुंबातील सदस्यांचे वय कमी होवू शकते. रोग, त्रास आणि अनावश्यक खर्च हे चालू राहतात. विशेषत: गृहस्वामींसाठी ही जागा दरवाजासाठी अशुभ मानली जाते.
पश्चिम दिशेकडील दुसरे पद द्वारिका मानले जाते. ही जागा देखील दरवाजासाठी शुभ नसते. ज्यांच्या घराचे दार या पदावर असते त्या घरातील व्यक्तींमध्ये उधळपट्टीची प्रकृती निर्माण होते. नोकरी आणि व्यवसायात अस्थिरता निर्माण होते. कधी कधी भयंकर धोका होवून जातो आणि कर्ज वाढून जाते.
पश्चिम दिशेकडील तिसरे पद आहे जो सुग्रीव पद नावाने मानले जाते. हा पद पश्चिम दिशेकडील सर्वात शुभ पद आहे. या पदावर दरवाजा असल्यास घरात आनंदाची बहर येते. व्यवसाय, कारखाना आणि दुकान इत्यादींसाठी दार बनवण्यासाठी ही अत्यंत शुभ जागा आहे. या जागी दरवाजा असणे घरातील विकासाचे दार उघडते. जर कंपनी किंवा कारखाना अथवा दुकान इत्यादींचा दरवाजा या जागी असेल तर लवकरच अनेक शाखा उघडल्या जातात.
पश्चिम दिशेकडील चौथे पद आहे. जे पुष्पदंत या नावाने ओळखले जाते. या पदावर घराचे दार असणे अत्यंत शुभ असते. या पदावर दार असल्याने घरात संतुलित उत्पन्न राहते. तसेच या घरातील मुलांची चांगली वाढ होते आणि प्रगती देखील होते. घरामध्ये सुख, शांती आणि एकतेचा निवास राहतो. अशा घरात लोक मर्यादित आयुष्य जगतात.
हे पश्चिम दिशेकडील पाचवे पद हे वरून पद आहे. पश्चिम दिशेकडील हे पद दरवाजासाठी अत्यंत शुभ असते. ज्या घराचे दार या पदावर असते, तेथील लोक हे खूप महत्वाकांक्षी असतात. ते प्रत्येक कामात प्रभुत्व प्राप्त करून टाकतात आणि धनाची वृद्धी व प्रतिष्ठेची वृद्धी निरंतर राहते. याच पदावर ज्या घराचे दार आहे तेथील व्यक्ती दुसऱ्यांची मदत करायला उशीर लावत नाही.
पश्चिम दिशेकडील सहावे पद असुर पद आहे. इथे दरवाजा बनवणे हे कुटुंबासाठी शुभ नसते. अशा घरांमध्ये तणाव आणि निराशेचा भाव लवकर येतो. आर्थिक हानी निरंतर होते. काही घरांमध्ये तर अशा स्थितीमधील दाराच्या घरामधील सदस्य नैराश्यात दिसले गेले आहे. धनाच्या संबंधी काहीना काही अभाव राहतोच.
हे पश्चिम दिशेकडील सातवे पद सौख्य पद आहे. या पदावर दार असणे शुभ नसते. नेहमी निराशेचे वातावरण राहते. अशा घरातील व्यक्ती स्वार्थी होऊन जातात. गृह स्वामीला निरंतर घराच्या बाहेर रहावे लागते. काही घरात तिथल्या लोकांच्या मनात नकारात्मक विचार घर करून टाकतात. यामुळे तिथली प्रगती प्रभावित होते.
हे पश्चिम दिशेकडील अंतिम पद पापयक्ष्मा पद आहे. ज्या व्यक्तींच्या घरातील दार हे या दिशेकडे असते त्या घरातील लोक हे स्वार्थी असतात. घरातील महिला सदस्य या आपल्या तब्यतीच्या बाबतीत चिंतेत असतात. पुरुषांना जास्त करून बाहेर रहावे लागते. काही लोक तर परदेशात अडकून जातात. थोड्यात ही जागा दारासाठी शुभ नाही आहे. घरामध्ये अनावश्यक आवक जावक चालू राहते. यामुळे घरात आर्थिक अपव्यय चालू राहतो.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
The post या दिशेला असेल घराचा दरवाजा तर नेहीच राहते घरात सुख समृद्धी appeared first on Tadka Marathi.

विष्णूदेवाच्या कृपेने या ६ राशी आल्या आहेत राजयोगामध्ये, होणार मोठा धनलाभ !

Previous article

फुफ्फुसांना नैसर्गिकरित्या बळकट करण्यासाठी आपल्या आहारात समावेश करा या ५ भाज्यांचा !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.