Royal politicsटॉप पोस्ट

दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला तर आम्ही भाजपसाठी प्रचार करु, नाहीतर…

0

दिल्ली:-

“2019 च्या निवडणुकीयाधी जर दिल्ली ला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळला तर आम्ही खात्री देतो की, येणार्‍या निवडणुकीत आम्ही भाजपसाठी प्रचार करू आणि दिल्ली तील जनतेला भाजपला मतदान करा असे आवाहन करू.” हे विधान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.

Loading...

दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळवा अशा मागणीसाठी विधान सभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. यात त्यांनी म्हटले की “दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळला तर आम्ही भाजपसाठी प्रचार करू, परंतू असे झाले नाही तर दिल्लीतील लोक आपल्या आपल्या घरावर ‘भाजप दिल्ली छोडो’ अशा पाट्या लावतील.” दिल्लीतील केजरीवाल यांचे सरकार दिल्लीत सत्ता स्थापनेपासूनच दिल्ली ला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवा यासाठी आक्रमक आहे.

आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी राज्यपालवर निशाणा साधत ‘राज्यपाल दिल्ली सोडा’ (एल-जी दिल्ली छोडो) असा नारा दिला आहे. दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळवा यासाठी अभियान चालवण्यात यावे यासाठी त्यांनी  कार्यकर्त्यांना आवाहन देखील केले आहे.

या आधी देखील केजरीवाल दिल्लीत सत्तेत आल्या आल्या हा मुद्दा चर्चेत आला होता. त्यावेळी नजीब जंग हे दिल्ली चे नायब राज्यपाल होते.  सध्या अनिल बैजल हे दिल्ली चे नायब राज्यपाल आहेत.

ह्या आधी देखील केजरीवाल यांच्याकडून करण्यात आली होती हीच मागणी 

मे 2016 या वर्षी हा वाद पेटला होता. राज्याच्या हंगामी सचिव पदी दिल्ली चे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याकडून नियुक्ती करण्यात आली होती, या बाबतचे नियुक्ती पत्र  केजरीवाल यांना पाठवण्यात आले होते. परंतू यावर त्यांनी कोणताही निर्णय न घेतल्याने  नायब राज्यपाल जंग यांनी त्यांच्या अधिकारात ही नियुक्ती केल्याने ह्या वादाला सुरुवात झाली होती. एकमेकांकडे असलेल्या अधिकार आणि प्रमुख कोण यावरून हा वाद झाला होता.

यावर दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ऑगस्ट 2017 ला या निकालावर निर्णय देताना संगितले की, नायब राज्यपाल नजीब जंग हेच दिल्ली केंद्रशासित प्रदेशाचे प्रमुख आहेत. यामुळे दिल्ली सरकारने नायब राज्यपाल यांच्या परवानगी शिवाय घेतलेला कोणताही निर्णय  वैध ठरत नाही. यावेळी उच्च न्यायालयाने 239 एएआणि एनसीटी कायद्याअन्वये दिल्ली केंद्रशासित प्रदेश राहणार असा निर्णय दिला होता. त्यामुळे दिल्ली सरकारने निर्माण केलेल्या या वादाला कोणताही आधार नसल्याचे उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले होते.

दिल्ली हे देशातील असे एकमेव राज्य आहे ज्याचे जमीन, कायदे आणि अधिकार, पोलिस हे केंद्रसरकरच्या अधीन आहे.

Loading...

गोरखपूर दुर्घटना प्रकरणातील डॉ. कफील खान यांच्या भावावर आज्ञातांकडून गोळीबार

Previous article

ट्रंप-किम एेतिहासिक भेटीत घडल्या अनेक महत्वाच्या घटना 

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *