Royal Entertainmentमुख्य बातम्या

स्त्रियांचे आरोग्य आणि समुपदेशन…

0

सामाजिक बांधिलकी व दृष्टिकोन असणारी ही स्त्री.  महिलांच्या आरोग्यासाठी काय उपाययोजना करणार आहोत, आपण महिलांच्या आरोग्याविषयी किती जागृत आहोत. याचा विचार केला पाहिजे. आज आपण सगळ्यांनी महिलांना निरोगी आयुष्यमान कसे मिळेल यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत. मी ती महिला तुमची आई, तुमची बहीण..तुमची बायको….तुमची काकी, मामी, मावशी, तुमच्या घरी काम करणारी ताई, मावशी असेल..
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या भारतातील महिला आपल्या आरोग्याकडे मात्र हवे तेवढे लक्ष देत नाहीत. शहरातील सुमारे 28 टक्के महिलांना स्तनांच्या कॅन्सरचा धोका असल्याचे वैद्यकीय सर्वेक्षणातून समोर आले आहे. स्त्रियांना गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
स्त्रियांमध्ये संधिवात, डायबेटिस, उच्च रक्तदाबाच्या तक्रारीही वाढत आहेत. भारतात स्त्रियांचे आरोग्य म्हणजे केवळ गरोदरपण व बाळंतपण एवढ्यापुरतेच मर्यादित असल्यामुळे शहर व ग्रामीण भागांतील असंख्य महिला कॅन्सरला बळी पडत आहेत. स्तनाचा कॅन्सर झालेल्या दहापैकी पाच महिलांचा मृत्यू होतो, असे एका वैद्यकीय पाहणीत आढळून आले आहे.
याचा अर्थ, भारतात स्तनाच्या कॅन्सरविषयी जनजागृतीचे प्रमाण खुपच कमी आहे. स्त्रियांचे मानसिक आरोग्य, प्रजननसंस्थेचे आजार, स्तन व गर्भाशयाचा कॅन्सर आणि रजोनिवृत्तीच्या वेळी होणारा त्रास आदींबाबत जरी सरकारने महिलांच्या आरोग्यविषयक अनेक उपक्रम राबविले आहेत, पण प्रत्यक्षात मात्र याची अंमलबजावणी होत नाही. भारतातील महिलांना स्तनाचा कॅन्सर होण्याचा कायमस्वरूपी धोका टक्के असतो. स्तनाच्या कॅन्सरचे निदान लवकर झाल्यास पेशंट पूर्णपणे बरे होऊ शकतात. त्यासाठी शालेय जीवनापासूनच मुलां-मुलींमध्ये याविषयी योग्य वैद्यकीय माहिती पुरवली गेली पाहिजे.
वयोमानानुसार महिलांना हाडे ठिसूळ होण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो. मासिक पाळी बंद झाल्यानंतर हे प्रमाण वाढत जाते. त्यामुळे परिणामी हाडे ठिसूळ झाल्यामुळे कंबरदुखी, गुडघेदुखी, मानदुखीचे प्रमाण वाढते. भारतीय महिलांमध्ये शरीरातील रक्‍ताचे कमी प्रमाण असण्याचा आजार खूप मोठ्या प्रमाणात आहे.
शरीरातील रक्ताचे कमी प्रमाण हे बरेच आजार निर्मितीचे कारण ठरते.
प्रमुख कारणे महिलांमध्ये आजारपणा वाढण्याची कारणे जर लक्षात घेतली तर..
सकस जेवणाचा अभाव, त्यामुळे शरीराराला कमी प्रमाणात मिळाणारी प्रथिने, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, लोह मासिकपाळी दरम्यान होणारा रक्तस्राव.
कौटुंबिक जबाबदारी मधून स्वतःच्या शरिराकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ नसणे.
पुरुष प्रधान संस्कृती मुळे…
बऱ्याच ठिकाणी मिळणारी दुय्यम वागणूक.
होणारी प्रसूती व प्रसूती दरम्यान व पक्षात न घेतलेली काळजी.
मासिकपाळी बंद झाल्यानंतर शरीरातील होणारे ग्रंथी मधील बदल, होणारी हाडांची झीज.
लवकर अथवा उशिरा होणारी लग्न व उशिरा होणारी गर्भधारणा.
गर्भधारणा होऊ नये म्हणून वापरली जाणारी वैद्यकीय सल्ला न घेता वापरली जाणारी गर्भधारणा बंदीची औषधे.
खरंच महिलांच्या आरोग्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत.
वर्षातून एकदा तरी महिलांची आरोग्य तपासणी केली पाहिजे. रक्‍तदाब, शरीरातील रक्‍ताचे प्रमाण, शरीरातील साखरेचे प्रमाण, पोटाची व ओटीपोटाची सोनोग्राफी,पॅप स्मीयर ही गर्भशयाच्या कर्करोगाची तपासणी, स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान करता येण्यासाठी स्तनाची मॅमोग्राफी, हाडांचा ठिसूळपणा तपासणी साठी डेक्‍झा स्कॅन तपासणी.
महिलांनी स्वतः स्वतःचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी प्रयतक्‍ केले जसे नियमित वैद्यकीय तपासणी व नियमित व्यायाम. योग्य तो आहार.आनंदी जीवन..तर निश्‍चितच ह्याचा फायदा होईल.
खरंच महिलांच्या आरोग्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले तर निश्‍चितच त्याचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी मदत होऊ शकते.
चला तर मग जागतिक महिला दिन 2020 च्या निमित्ताने आपण स्त्रीच्या निरोगी आयुष्याची मुहूर्तमेढ रोवूयात.
– डॉ. सचिन नागापूरकर
The post स्त्रियांचे आरोग्य आणि समुपदेशन… appeared first on Dainik Prabhat.

‘सफरचंद’ एक फायदे अनेक…

Previous article

स्त्रियांचे आरोग्य आणि समुपदेशन…

Next article

You may also like

Comments

Comments are closed.