टॉप पोस्ट

POEM : स्वच्छ नि सुंदर हरित भारत

0

इवल्या इवल्या हातांनी या

मोठी मोठी कामे करायची

Loading...

स्वच्छ नि सुंदर हरित भारत

जगाला ओळख सांगायची…

आई बाबा ताई दादा

प्लास्टिकचा वापर टाळाल का?

नदी आणि जमिनीच्या

प्रदूषणाला तुम्ही थांबवाल का?

रानेवने नि उद्याने सुंदर स्थळे राखायची

स्वच्छ नि सुंदर… ||१||

परिसरा ठेऊ या छान

टाकू नका तुम्ही कुठेही घाण

अंगी लावू सवयी छान

उंच करू या देशाची मान

घरीदारी, रस्त्यावरी सर्वत्र स्वच्छता रखायची

स्वच्छ नि सुंदर…||२||

झाडे लावू, झाडे जगवू

पशुपक्षांना निवारा देऊ

शुद्ध हवेत श्वास घेऊ

आजार सारे दूर ठेऊ

रानोमाळी,डोंगरावरी सर्वत्र हिरवाई रखायची

स्वच्छ नि सुंदर…||३||

                                                                                 – संगीता शिरगावकर

 

Loading...

रजनीकांतचा ‘काला’ अडकला वादात, मानहानीचा दावा दाखल

Previous article

अफगाणिस्तानची बांगलादेशवर मात, मालिकेत विजयी आघाडी

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *