Royal politicsभारतमहाराष्ट्रमुख्य बातम्या

राम मंदिर बांधा अन्यथा तुम्हाला रामराम करू ; साक्षी महाराजांची भाजपलाच धमकी

0

टीम महाराष्ट्र देशा : दोन दिवसांपूर्वी राम मंदिर बांधण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने मोदी सरकारला ३१ जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. यामध्ये आता आणखी भर पडली असून राम मंदिरावरून भाजपामध्ये अंतर्गत कलहाला सुरूवात झाल्याचे दिसून येत आहे. भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी भाजपाला राम मंदिर बांधा अन्यथा पक्षाला रामराम करू अशी धमकी दिली आहे. ‘आज भारतीय जनता पार्टीचे अस्तित्व आहे ते भगवान रामाच्या आशीर्वादामुळे आणि राम मंदिर आंदोलनामुळे आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जर राम मंदिर बांधले नाही तर भाजपाच्या सदस्यतेचा राजीनामा देणार.’ असे साक्षी महाराज यांनी सांगितले आहे.

‘दोन दिवसांपूर्वी विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर बांधण्यावरून सरकारला इशारा दिला होता. सरकारने त्याचा सन्मान करायला हवा. राम मंदिर हा भारतातील लाखो लोकांच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे केंद्र सरकारने संसदेत याबातचा कायदा मंजूर करून घ्यावा. तसेच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार राम मंदिर बांधावे,’ असेही साक्षी महाराज म्हणाले.

Loading...

उदयनराजे की श्रीनिवास पाटील,साताऱ्याचा उमेदवार आज पवार ठरणार

Previous article

सत्तेविना विरोधकांची अवस्था जलाविना मासळी सारखी झाली आहे : राम शिंदे

Next article

You may also like

Comments

Comments are closed.