Royal politicsटॉप पोस्टभारतमहाराष्ट्रमुख्य बातम्या

ज्योतिरादीत्य सिंधीया भाजपमध्ये प्रवेश करणार ?

0

मध्यप्रदेशच्या कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावरून राज्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. याच पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री कमलनाथ हे आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल होणार आहेत. या पदासाठी अनेकांची नावे चर्चेत आहेत पण कॉंग्रेसचे नेते ज्योतिरादीत्य सिंधीया यांनीदेखील या पदावर आपला दावा केला आहे त्यामुळे येत्या काळात त्यांना हे पद मिळाले नाही तर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांची मध्य प्रदेशच्या काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यासाठी त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यातील काँग्रेस अध्यक्ष अशोक दांगी यांनी 500 कार्यकर्त्यांसह राजीनाम्याचा इशारा दिला.

ज्योतिरादित्य शिंदे यांना अध्यक्ष करावं ही आमचीही भूमिका आहे. मी पक्षनेतृत्त्व सोनिया गांधी, राहुल गांधींनाही त्याबाबतची माहिती दिली, असं कमलनाथ म्हणाले.

सदाभाऊ खोत बरळले ; शेट्टींनी अक्‍कल नसल्याचे दाखवले

Previous article

189 पर्यटनस्थळांचे आराखडे मंजूर; वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

Next article

You may also like

Comments

Comments are closed.