मुख्य बातम्या

कोरोना काळात आंदोलन केलेल्या शिवसेनेच्या आंदोलकांवर कारवाई होणार का ?

0

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून आणि अमली पदार्थांच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि पोलिसांवर टीका करणाऱ्या आणि मुंबईची पीओकेशी तुलना करून अवमान करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौतला मुंबई महानगरपालिकेने दणका दिला आहे.
कंगना आज मुंबईत आली. यावेळी मुंबई एअरपोर्टवर शिवसेनेने मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. विशेष म्हणजे एअरपोर्टमधील ग्राऊंड स्टाफचाही शिवसेनेच्या या आंदोलनाला पाठिंबा होता. कंगनाविरोधात विमानतळावर आंदोलन करताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना  भान राहिले नाही आणि कोरोनाच्या महासंकटात सोशल डिस्टसिंगचा पुरता फज्जा यावेळी उडाला.
कंगनाविरोधात सुड बुद्धीचे राजकारण करताना शिवसेना दिसते. मात्र यावेळी सध्याच्या महासंकटाचा बहुतेक यांना विसर पडलेला दिसतोय. स्वत:च्या स्वार्थासाठी या कार्यकर्त्यांच्या आरोग्याचा विचार करावसा वाटला नाही का यांना ?
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर पाळणे हे अतिमहत्वाचे आहे. मात्र आंदोलनाच्या या नादात सेनेच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून या नियमाचे पालन झाले नाही. या संपूर्ण प्रकारात कोरोनाचा संसर्ग जर या कार्यकर्त्यांना झाल्यास यांची जबाबदारी यांचा पक्ष घेणार ?
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. मग आता महापालिका यांच्यावरही कारवाई करणार का हे पाहणे महत्वाचे आहे. कारण इतरवेळी सामान्य नागरिक काही कारणांसाठी गर्दी करतात , जमावाने कार्यक्रम करतात तेव्हा त्यांच्यावर  अगदी तातडीने कारवाई केली आहे. त्यामुळे आता सत्तेत असणारा शिवसेना पक्ष , BMC काय कारवाई करतात हे बघणे महत्वाचे ठरेल.
महत्वाच्या बातम्या :-
मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? भाजपा नेत्याचा खडा सवाल

पोलिसांच्या विनंतीला वंचितचा प्रतिसाद ; पंढरपूरात मंदिर प्रवेश आंदोलन शांततेत

रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पुण्यातील जंबो कोविड सेंटरवर फौजदारी कारवाई करा !

दार उघड उद्धवा दार उघड ; भाजपचं राज्यभर घंटानाद आंदोलन

मोदींनी इतक्या वर्षात 1800 रुपयांची नोट का काढली नाही? व्हायरल काकूनंतर काकांची मागणी
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. कोरोना काळात आंदोलन केलेल्या शिवसेनेच्या आंदोलकांवर कारवाई होणार का ? InShorts Marathi.

BMC कायद्यानुसार काम करत आहे ; कंगना VS शिवसेना वादावर शरद पवारांचे वक्तव्य !

Previous article

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ; मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस दिली स्थगिती

Next article

You may also like

Comments

Comments are closed.