Royal politicsटॉप पोस्ट

पहा फोटो – मतांसाठी पाकिस्तानी नेत्याने केले हे कृत्य

0

मतांसाठी नेते मंडळी काय काय करतील ते सांगता येत नाही. पाच वर्षातून एकदाच लोकांकडे जाणारे नेते मंडळी तर आपण नेहमीच पाहतो. वेगवेगळ्या प्रकारची शक्कल लढवून ही नेते मंडळी फेमस होण्याचा प्रयत्न करत असतात.

बॅनरबाजीची तर गोष्टच वेगळी.  गाॅगल घालून, सोन्याच्या चैनी घालून, हात जोडलेले फोटो आपण नेहमीच पाहतो; पण पाकिस्तानच्या एका नेत्यांने मतांसाठी आणि प्रसिध्दीसाठी जे केलं आहे ते पाहून तुमचा विश्वास बसणार नाही.

Loading...

पाकिस्तानच्या कराची शहरातील नेत्याने मतं मिळवण्यासाठी आणि प्रसिध्दीसाठी चक्क गटाराच गाठले. कचऱ्याच्या ढिगावर देखील झोपायला त्याने कमी केले नाही. तसेच रस्त्यावर साचलेल्या पाण्यात देखील झोपून फोटो काढले.

‘आम आदमी पाकिस्तान’ या पक्षाचे उमेदवार अयाझ मेमोम मोतीवाला हे या नेत्याचे नाव अाहे. शहरामध्ये स्वच्छते विषयी प्रचार करण्यासाठी त्यांनी ही पध्दत वापरली. तसेच त्यांनी त्यांचे हे फोटो त्यांच्या फेसबुक पेजवर देखील टाकले.

भारतातील स्वच्छता मोहिमेचा संदेश देण्यासाठी देखील या पध्दतीचा वापर कोणी केला नसेल.

अयाझ मेमोम मोतीवाला यांनी 30 जूनला हा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ते पाकिस्तानातील लोकांना स्वच्छतेविषयी संदेश देत आहेत.

 

सध्या कराचीमध्ये वाॅटर क्रायसिस सुरू असताना हे फोटो व्हायरल झाले आहे. तसेच या महिन्यात पाकिस्तानमध्ये निवडणूका आहेत. त्यामुळे नेते मंडळी प्रचारासाठी नवनवीन हातखंडे वापरत आहेत.

(Facebook/@ayazmemonmotiwala)

(Facebook/@ayazmemonmotiwala)

(Facebook/@ayazmemonmotiwala)

Loading...

‘आप’ पंतप्रधान मोदींना लिहिणार 10 लाख पत्र, ‘संपूर्ण राज्याचा दर्जा’ देण्याच्या वचनाची आठवण

Previous article

अफवांमुळे 5 जणांची हत्या, 23 जणांना अटक

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *