मुख्य बातम्या

कंगनाप्रमाणेच राज्यपाल शेतकऱ्यांना भेटण्याची तत्परता का दाखवत नाहीत ?- रविकांत तुपकर

0

अभिनेत्री कंगना रनौत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनात गेली होती. कंगनाच्या वांद्र्यातील कार्यालयावर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. साधारण 40 मिनिटे दोघांची चर्चा झाली.
मात्र कंगना रनौत आणि राज्यपालांच्या या भेटीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सडकून टीका केली आहे. ‘कंगनावर झालेला अन्याय ऐकण्यासाठी राज्यपाल महोदयांनी तिला तात्काळ भेट दिली. पण वर्षांनुवर्षे अन्याय सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटण्याची तत्परता मा.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दाखवतील काय..?’ असा सवाल रविकांत तुपकर यांनी विचारला आहे.
अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यातील वादाने राज्यातील संपूर्ण राजकारण ढवळून निघाले आहे. हिंदी मिडिया मधील काही पत्रकार या प्रकरणात चांगलेच आक्रमक झाले होते. मात्र ६ महिन्यांपासून देशातील आणि राज्यातील रसातळाला गेलेली अर्थव्यवस्था, मेटाकुटीला आलेला शेतकरी, भविष्य अंधारात असलेले विद्यार्थी यांच्याकडे सोयीस्करपाने दुर्लक्ष होत आहे.

कंगनावर झालेला अन्याय ऐकण्यासाठी राज्यपाल महोदयांनी तिला तात्काळ भेट दिली. पण वर्षांनुवर्षे अन्याय सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटण्याची तत्परता मा.राज्यपाल @BSKoshyari दाखवतील काय..? @ANI
— Ravikant Tupkar (@Ravikanttupkar1) September 13, 2020

महत्वाच्या बातम्या :-

‘ही बाळासाहेबांची शिवसेना उरलीच नाही’ ; कंगनाची आई कडाडली
बबड्याची सीरिअल पाहण्याऐवजी…’ ; रोहित पवारांनी शेलारांना सुनावले खडे बोल
वडिलांमुळे संपत्ती मिळू शकते पण सन्मान तुम्हालाच कमवावा लागतो ; कंगनाची मुख्यमंत्री ठाकरेंवर घणाघाती टीका
लॉकडाऊन हा विषय आता संपला ; राजेश टोपे यांचा मोठा खुलासा
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा उद्धव सरकारने घोटला?

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. कंगनाप्रमाणेच राज्यपाल शेतकऱ्यांना भेटण्याची तत्परता का दाखवत नाहीत ?- रविकांत तुपकर InShorts Marathi.

पहाटे शपथविधी झालेला चालतो मग अनधिकृत बांधकाम तोडलं तर काय चुकलं ?

Previous article

‘दिल्लीत पवारांना हाणले होते ते मंत्री जितेंद्र आव्हाड विसरलेले दिसताहेत’- भाजप आमदार

Next article

You may also like

Comments

Comments are closed.