मुख्य बातम्या

बॉलिवूड व ड्रग माफीयांची माहिती न देताच ड्रामा क्वीन का परत गेली ? काँग्रेसचा कंगनावर निशाणा

0

बॉलिवूड आणि ड्रग माफियांची माहिती न देताच ‘ड्रामा क्वीन’ का परत गेली? असा सवाल विचारत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी अभिनेत्री कंगना रनौतवर निशाणा साधला. गुन्ह्याची माहिती दडवणे हा सुद्धा गुन्हाच असल्याचे सांगत महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपचा अजेंडा उघड झाल्याचा दावाही त्यांनी केला. मुंबई आणि महाराष्ट्राला वाट्टेल ते बोलणारी ड्रामेबाज नटी मुंबईत येण्याआधी फारच फुशारक्या मारत होती.
बॉलिवूडच्या ड्रग कनेक्शन संदर्भात आपल्याकडे माहिती आहे, असेही ती तावातावाने सांगत होती. महाराष्ट्र सरकारला आव्हान देण्याची भाषा करत मुंबईत येऊन या नटीने तमाशाही केला. परंतु ड्रग संदर्भातील कोणतीही माहिती सरकारी यंत्रणांना न देताच परत का गेली, असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.
 
बॉलिवूडचे ड्रग माफीया कनेक्शन व त्यासंदर्भातील गुन्ह्यांची माहिती तिच्याकडे आहे, असे कंगनाने जाहीरपणे सांगितले होते. अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात ड्रग कनेक्शन उघड होताच NCB याप्रकरणी चौकशी करत होती, त्यांच्याकडे कंगनाने ड्रग संदर्भातील माहिती देणे उचित होते. परंतु या नटीने कसलाही संदर्भ नसताना मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली. मुंबई पोलीस याचा त्यावेळी तपास करत नव्हते. कंगनाकडे बॉलिवूड व ड्रग कनेक्शनची जी माहिती आहे ती तिने एनसीबीकडे द्यावी, अशी आम्ही मागणीही केली होती. पण मुंबईत काही दिवस राहून कंगनाने ही माहिती दिली नाही, हे आश्चर्यकारक असल्याचे सावंत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :-

Loading...

कोरोना उपचाराच्या नावाखाली नुसत्या नोटाच छापू नका ; मुश्रीफांचा खासगी डॉक्टरांना सल्ला
राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या चिराग पासवानांवर रोहित पवार चिडले
दोषी प्रशांत भूषण यांना १ रुपया दंड, न भरल्यास ३ महिने तुरुंगवास
काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल ; गुलामनबी, खरगे यांना महासचिव पदावरून हटवले !
संजय राऊत हे एक नंबरचे कार्टून कॅरॅक्टर आहेत ; अर्णब गोस्वामींची जोरदार टीका

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. बॉलिवूड व ड्रग माफीयांची माहिती न देताच ड्रामा क्वीन का परत गेली ? काँग्रेसचा कंगनावर निशाणा InShorts Marathi.

Loading...

कांदा निर्यातबंदीच्या निर्णयानंतर शरद पवारांनी केंद्राला खडसावले, म्हणाले ….

Previous article

राज्यसभेत बॉलिवूडला गटार म्हणणाऱ्यांवर जया बच्चन भडकल्या , म्हणाल्या “खाल्लेल्या थाळीतच….

Next article

You may also like

Comments

Comments are closed.