मुख्य बातम्या

मुंबईची तुंबई झाल्यावर बोंबा मारणारे नागपूर,अहमदाबाद जलमय झाल्यावर गप्प का? सेनेचा खोचक सवाल

0

“मुंबईतील पाणी तुंबले म्हणून बोंब मारणारे नागपूर, अहमदाबाद अशाच प्रकारे जलमय होते तेव्हा मात्र गप्प असतात,” अशी टीका शिवसेनेने विरोधकांवर केली आहे.
मुंबईत मुसळधार पावसामुळे मुंबई तुंबल्याने पालिकेसह राज्य सरकारवर टीका करणाऱ्यांना शिवसेनेने चांगलेच फैलावर घेतलं आहे. “1994 ते 2020 या काळात सप्टेंबर महिन्यात एका दिवसात एवढा पाऊस मुंबईत कधीच झाला नव्हता. मुंबईसारख्या शहराला कमी वेळात अतिवृष्टी होणे आणि त्याच वेळी समुद्राला भरती असणे हा ‘योग’ नवीन नाही. त्याचाही दुष्परिणाम सखल भाग जलमय होण्यात होत असतो.
तरीही मुंबईच्या नावाने काव काव करणारे काही डोमकावळे आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहणारे विरोधक आपले बोंबा मारणे सुरूच ठेवतात,” असा टोला शिवसेनेने विरोधकांना लगावला आहे. शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’तून मुंबई तुंबण्याची कारणं देतानाच विरोधकांवरही टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या :-
माझे घर पाडण्यापेक्षा ‘त्या’ इमारतीकडे लक्ष दिले असते तर… ; कंगनाचा पुन्हा ठाकरे सरकारवर निशाणा
सरकारच्या चिंतेत वाढ ; नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची बाधा
‘अति तिथे माती’ शिवसेनेचा अंत जवळ आलाय ; निलेश राणेंचा सेनेवर हल्लाबोल
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता नमो कंट्रोल्ड ब्युरो झाला आहे का? काँग्रेसचा थेट सवाल
सुशांतच्या मृत्यूचं कारण अखेर उघडलं ; समोर आला ‘हा’ नवा रिपोर्ट
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मुंबईची तुंबई झाल्यावर बोंबा मारणारे नागपूर,अहमदाबाद जलमय झाल्यावर गप्प का? सेनेचा खोचक सवाल InShorts Marathi.

जंबो कोविंडसेंटरमधून बेपत्ता झालेल्या लेकीसाठी माऊलीचे आमरण उपोषण

Previous article

OBC आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास… ; OBC समाजाचा राज्य सरकारला इशारा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.