मुख्य बातम्या

रियानंतर आता कुणाचा नंबर,ठाकरे परिवार घाबरले ; किरीट सोम्मय्यांचा हल्ला

0

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक झाल्यानंतर ठाकरे सरकारवर टीकेचे रान उठले आहे.आधी तिचा भाऊ शौबीक चक्रवर्ती नंतर आता यामध्ये रियानंतर कुणाचा नंबर याची भीती सरकारला वाटत आहे अशी टीका किरीट सोमैय्या यांनी केली आहे. याआधी या केसमद्ये आदित्य ठाकरे यांचा नाव आले असून आता या टीकेनंतर राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘रियाला अटक झाली आहे, आता पुढची चौकशी आणि अटक कोणाची होणार? याची भीती ठाकरे परिवार आणि सरकारला वाटत असेल,’ असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

# रियाला अटक. ठाकरे सरकार / परिवाराची चिंता वाढली असेल की या पुढील अटक कोणाला होईल? # सुशांतसिंग यांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीबाबत पहिल्या दिवसापासूनच तपासात दिरंगाई केल्याप्रकरणी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे पोलिस आयुक्त यांना पदावरुन काढून टाकले पाहिजे pic.twitter.com/8FeE9Qyipv
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 8, 2020

‘ठाकरे सरकारने ६० दिवस हे प्रकरण दाबून ठेवलं. सीबीआयने फक्त २ आठवड्यात करून दाखवलं. गृहमंत्री अनिल देशमुख यांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हायला हवी. तसंच मुंबई पोलीस आयुक्तांची घरवापसी झाली पाहिजे,’ अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. रियानंतर आता कुणाचा नंबर,ठाकरे परिवार घाबरले ; किरीट सोम्मय्यांचा हल्ला InShorts Marathi.

मोदींना जाब विचारण्याची हिंमत आहे का? मुख्यमंत्र्यांचा भाजपला खडा सवाल

Previous article

महत्वाची बातमी : फ्लॅट खरेदी करताना भरावी लागणार नाही एकही रुपयाची स्टॅम्प ड्युटी !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.