Royal politicsटॉप पोस्ट

कोण होते शुजात बुखारी? ज्यांची काश्मीरमध्ये हत्या करण्यात आली

0

जम्मू-काश्मीर येथून निघणाऱ्या ‘रायझिंग काश्मीर’ या वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांची काल (गुरूवार) अज्ञातांकडून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात त्यांचा खाजगी सुरक्षा रक्षकाचा देखील मृत्यू झाला.

पोलिसांनी कडून या बाबतीत प्रथम दर्शनी हा हल्ला दहशतवाद्यांकडून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. श्रीनगर येथील प्रेस काॅलनीतून ते कारने इफ्तार पार्टीला जात असताना त्यांच्या आॅफिसच्या बाहेर हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने हाॅस्पिटलमध्ये नेण्यात आले; पण तो पर्यंत त्यांचा मृत्यू झाला. शुजात बुखारी हे 50 वर्षांचे होते.

Loading...

या आधी देखील त्यांच्यावर तीन वेळा हल्ला करण्यात आला होता. 2000 मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना पोलिस संरक्षण देण्यात आले होते. ईदच्या दोन दिवस आधी झालेल्या हल्ल्यामुळे जम्मू-काश्मीर हदरून गेले आहे.

कोण होते शुजात बुखारी?

– काश्मीरच्या श्रीनगर येथून निघणाऱ्या ‘रायझिंग काश्मीर’ या वृत्तपत्राचे ते मुख्य संपादक होते.

– रायझिंग काश्मीरच्या आधी ते ‘द हिंदू’ या वृत्तपत्रात ब्यूरो चिफ होते. ते ह्या पदावर 15 वर्ष कार्यरत होते.

– त्यांनी पत्रकारीतेचे शिक्षण मनिला युनिवर्सिटीमधून घेतले होते.

– ते काश्मीरमधील ‘अदबी मार्कज काम्राज’ या सर्वात जुन्या कला व साहित्य संस्थेचे अध्यक्ष होते.

– त्यांना वर्ल्ड प्रेस इस्टिट्यूट (अमेरिका) आणि एशियन सेंटर फाॅर जर्नलिझम सिंगापूर या संस्थेची फेलोशिप प्राप्त होती.

– तसेच त्यांना ईस्ट वेस्ट सेंटर, अमेरिका यांची देखील फेलोशिप मिळाली होती.

– ‘रायझिंग काश्मीर’ या त्यांच्या वृत्तपत्रातून ते अनेक वेळा सरकारच्या चूकीच्या धोरणांवर टीका करत असे.

– शुजात बुखारी यांचे भाऊ सय्यद बशरत बुखारी हे मेहबूबा मुफ्ती सरकारमध्ये कायदा मंत्री आहेत.

– 2017 साली दुबई येथे पाकिस्तानशी चर्चा करण्यासाठी गेल्या ट्रक -II शिष्टमंडळाचे ते सदस्य होते.

– काश्मीर मध्ये शांतता यावी यासाठी अनेक वेळा आयोजित करण्यात आलेल्या परिषदेचे ते महत्वाचे सदस्य होते.

शुजात बुखारी यांच्या हत्येनंतर नेत्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया –

1)जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती –

2)जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अबदुल्ला –

3)काॅंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी –

4)पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी –

5) युनियन मिनिस्टर राजनाथ सिंग –

6) योगेंद्र यादव –

7) काॅंग्रेस नेते कपिल सिब्बल –

8) सिताराम येच्चूरी

(PHOTO INPUT :- FACEBOOK)

Loading...

मद्रास उच्च न्यायालयाचे तमिळनाडूतील आमदारांच्या अपात्रतेबाबत एकमत नाही

Previous article

Race 3 Movie Review:- नुसतीच धावाधाव, स्टंट आणि गाड्यांची जाळपोळ

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *