मुख्य बातम्या

कंगनाचा विषय महाराष्ट्रात कोणी सुरू केला? चंद्रकांतदादांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल

0

महाराष्ट्राच्या बदनामीबद्दल मुख्यमंत्रिपदाचा मास्क बाजूला ठेवून बोलणार आहे असा सूचक इशारा देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपनं पलटवार केला आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी खरोखरच मुखवटा बाजूला सारण्याची गरज आहे. तरच त्यांना वस्तूस्थिती समजेल, असं सांगतानाच, ‘कंगना राणावतचा विषय महाराष्ट्रात कोणी सुरू केला,’ असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

“मुख्यमंत्र्यांनी आपला मुखवटा बाजूला सारण्याची गरज…” pic.twitter.com/iRrPOuwflS
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) September 13, 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. चंद्रकांत पाटील यांनी ट्वीटच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.
‘विरोधी पक्ष राजकारण करतोय असा मुख्यमंत्र्यांचा दावा असेल तर कंगनाचा विषय महाराष्ट्रात कुणी सुरू केला? शिवसेनेने ना?,’ असा प्रश्न पाटील यांनी केला. सुशांतसिंहच्या प्रकरणात एफआयआर दाखल करून मुंबई पोलिसांनी योग्य चौकशी केली असती तर केंद्रीय तपास यंत्रणेला काहीच करावे लागले नसते. त्यामुळं तुम्ही ज्याला ‘मास्क’ म्हणता तो मुखवटा बाजूला सारण्याची गरज आहे,’ असा टोला पाटलांनी हाणला आहे.
महत्वाच्या बातम्या :-

उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख पडला महागात ; अब्रूनुकसानीचा कंगनाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल
अनिल देशमुखांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार आहे का ?
‘कोरोना व्हायरसचा नाश झाला’, कोरोनाचा कहर वाढत असताना भाजपचा नेता बरळला
महाराष्ट्रात ठाकरे सरकारचे अत्याचार वाढलेत केंद्राने लवकर हस्तक्षेप करावा – कंगना राणौत
ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात आता कंगनाचीही चौकशी होणार ; गृहमंत्र्यांचे मुंबई पोलिसांना कडक आदेश

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. कंगनाचा विषय महाराष्ट्रात कोणी सुरू केला? चंद्रकांतदादांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल InShorts Marathi.

मुख्यमंत्र्यांची स्थिती म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे ; भाजपचा मुख्यमंत्री ठाकरेंवर हल्लाबोल

Previous article

“यांना फक्त दगडी मारायला मराठी माणूस पाहिजे” ; निलेश राणेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.