Royal politicsमहाराष्ट्रमुख्य बातम्या

धनंजय महाडिकांना पर्यायी उमेदवार कोण ?

0

टीम महाराष्ट्र देशा- कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक यांनी गेल्यावेळी मोदीलाट असतानाही लक्षणीय विजय मिळवला होता. अर्थात, महाडिक यांच्या विजयात त्यांच्या प्रतिमा, कामांसह काँग्रेस- राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील आमदार, पक्षाचे पदाधिकारी यांचा मोठा वाटा होता. निकालानंतर मात्र महाडिक यांनी पक्षाच्या वाढीसाठी, संघटन कार्याकडे दुर्लक्ष केल्याची ओरड पक्षातून होऊ लागली आहे . पक्षाची उमेदवारी आपल्याला मिळणार याबाबत त्यांना खात्री आहे. ‘आगामी लोकसभेची निवडणूक निश्चितपणे लढवणार आहोत’, असे सांगत त्यांनी आपली वाटचाल स्पष्ट केली आहे.

महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका आदी निवडणुकांवेळी पक्षाचे उमेदवार महाडिक हे आपल्याला मदत करतील, अशी आशा बाळगून होते. पण, त्यांच्याकडून मदत झालीच नाही असा आक्षेप पक्षातून घेतला जात होता. महाडिक यांना आधीच काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी विरोध केला आहे. आता त्यांच्याशी सूर न जुळलेल्या आमदार हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी मुंबईत लावलेला विरोधी सूर महाडिक यांना उमेदवारी मिळण्यात अडथळा ठरणारा आहे.

Loading...

पर्यायी उमेदवार कोण?

महाडिक यांना पक्षातून विरोध झाला, पण त्यांच्याऐवजी ‘यांना’ उमेदवारी द्या अशी मागणी झाली नाही. याचा अर्थ सरळ आहे. दुसरा ताकदीचा पर्यायी उमेदवार सध्या तरी नाही. आमदार मुश्रीफ प्रबळ दावेदार आहेत. पण त्यांना राज्यात रस आहे. माजी आमदार के.पी. पाटील, ए.वाय. पाटील यांची नावे पुढे केली जातात, पण त्यांना देखील कणभरही इच्छा नाही.

मुश्रीफांना लोकसभेत पाठवण्यासाठी के.पीं. ची धडपड सुरू आहे, कारण जोपर्यंत ते आमदार आहेत, तो पर्यंत मंत्रिमंडळात त्यांचे स्थान पक्के आहे. हीच अवस्था ए.वाय. यांची आहे. पण उलट याच दोघांपैकी एकाच्या गळ्यात लोकसभेची माळ घालण्याचा प्रयत्न आमदार मुश्रीफ यांचा आहे.

वाट्टेल ते झालं तरी आता कॉंग्रेससोबत युती करणार नाही : मायावती

Loading...

प्रत्येकाच्या अकौंटमध्ये १५ लाख जमा करणार, असं मोदी बोललेच नव्हते; माधव भांडारी यांचा दावा

Previous article

एका आठवड्यात वाराणसी सोडा अन्यथा परिणाम भोगा, मराठी-गुजराती नागरिकांना जाहीर धमकी

Next article

You may also like

Comments

Comments are closed.