Royal politicsटॉप पोस्ट

अरविंद केजरीवाल यांना नायब राज्यपालांच्या कार्यालयात आंदोलन करण्याची परवानगी कोणी दिली – दिल्ली हायकोर्ट

0

दिल्ली हायकोर्टाने आम आदमी पार्टीच्या सरकारला विचारले आहे की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात धरणे आंदोलन करण्याचा अधिकार कोणी दिला? कोर्ट ‘आप’ला म्हणाले की, केजरीवाल  कोणाच्याही घरात अथवा कार्यालयात अशा प्रकारचे आंदोलन करू शकत नाही.

Loading...

दिल्लीतील आयएसएस अधिकाऱ्यांच्या कथित संपाच्या विरोधात अरविंद केजरीवाल व त्यांचे तीन मंत्री मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन व राय हे 11 जून पासून नायब राज्यपालांच्या कार्यालयात आंदोलन करत आहेत. पीटीआई नुसार, याच मुद्यांवर दिल्ली हायकोर्टाचे जस्टिस एके चावला आणि नवीन चावलाच्या खंडपीठाने म्हटले की, ‘आप’चे सरकार नायब राज्यपालांच्या कार्यालयात बसले आहेत जर हे आंदोलन आहे तर हे कार्यालयाच्या बाहेर पाहिजे. नायब राज्यपालांचे कार्यालय हे विरोध प्रदर्शन करण्याची जागा नाही.

दिल्ली हायकोर्टात या बाबतीत दोन याचिका दाखल केल्या गेल्या आहेत. एक याचिका अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनाच्या विरोधात तर दुसरी याचिका आयएसएस अधिकाऱ्यांच्या संपाच्या विरोधात आहे. तसेच आणखी एक याचिका भाजप नेते विजेंदर गुप्ता यांच्या कडून देखील दाखल करण्यात आली आहे. हायकोर्ट यावर 22 जूनला सुनवाई करणार आहे.

तसेच विरोध म्हणून काल झालेल्या निती आयोगाच्या बैठकीत अरविंद केजरीवाल सहभागी नव्हते झाले.

आंदोलनाला झाले आठ दिवस – 

अरविंद केजरीवाल व त्यांच्या तीन मंत्र्यांचे दिल्ली चे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात धरणे आंदोलनाला आज आठ दिवस झाले आहेत.  या नेत्यांमधील मंत्री सतेंद्र जैन व उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे बुधवार पासून अनिश्चित काळासाठी उपोषणावर बसले आहेत. तसेच रविवारी रात्रीपासून सतेंद्र जैन यांची तब्येत ढासळत चालली आहे.

का करत आहेत आंदोलन ?

– दिल्लीतील आयएएस अधिकार्‍यांनी आपला संप मागे घ्यावा .

  • रेशन ची डोरस्टेप डिलीवरी ही योजना लागू करावी.

या मागण्यांसाठी ‘आप’तर्फे आंदोलन केले जात आहे.

आंदोलनाला प्रादेशिक पक्षांचे समर्थन –

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्र्यांना प्रादेशिक पक्षांचे समर्थन मिळताना दिसून येत आहे. यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, राष्ट्रीय लोक दलाचे जयंत चौधरी, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, कमल हसन आणि भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा समावेश आहे. सीपीआई आणि सीपीएम यांच्या बरोबरच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी देखील अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनाचे समर्थन केले आहे.

हे ही वाचा – 

अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान मोदींना पत्र, आयएएस अधिकार्‍यांचा संप मागे घेण्याची मागणी

अरविंद केजरीवाल यांना प्रादेशिक पक्षांचे देखील समर्थन, लगातार सहाव्या दिवशी आंदोलन सुरूच

दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला तर आम्ही भाजपसाठी प्रचार करु, नाहीतर…

Loading...

कर्नाटकमध्ये जर एखाद्या कुत्र्याचा मृत्यू झाला तर त्याला पंतप्रधान मोदी कसे जबाबदार असतील?-प्रमोद मुतालिक

Previous article

34 वर्षांनी आॅस्ट्रोलियाच्या संघाबरोबर घडली ही गोष्ट

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *