मुख्य बातम्या

आदित्यसोबत असलेली मंडळी उघडी पडल्याने मुख्यमंत्री माझ्याविरोधात गेलेत ; कंगनाचा शिवसेनेवर निशाणा

0

चार दिवसांच्या मुंबईतील मुक्कामानंतर हिमाचल प्रदेशला परतलेल्या अभिनेत्री कंगना रनौतने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला. आदित्य ठाकरे यांच्यासोबत ऊठबस असलेली मंडळी माझ्यामुळे उघडी पडल्यानेच मुख्यमंत्री आणि राज्य सरकार माझ्याविरोधात गेल्याचा आरोप कंगनाने ट्विटरद्वारे केला.
कंगनाने सोमवारी सायंकाळी टिष्ट्वट करून ठाकरे सरकार सूडबुद्धीने कारवाई करीत असल्याचा आरोप केला. बॉलीवूड माफिया, सुशांतसिंह राजपूतचे मारेकरी आणि त्यातील ड्रग्ज रॅकेटचा मी पर्दाफाश का केला, हाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आक्षेप आहे. कारण, या सर्व मंडळींची त्यांचे लाडके चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्यासोबत ऊठबस आहे. त्यांना उघडे पाडले हाच माझा अपराध असून त्यामुळेच त्यांना माझा बंदोबस्त करायचा आहे. ठीक आहे, करा प्रयत्न. बघू कोण कोणाचा बंदोबस्त करते ते, असे ट्विट कंगनाने केले. याशिवाय, रक्षकच भक्षक असल्याचे जाहीर करत आहेत. लोकशाहीला धक्का लावला जात आहे. मला कमकुवत समजून मोठी चूक करत आहेत. एका महिलेला घाबरवून, माझा अवमान करून स्वत:ची प्रतिमाच मातीमोल करत आहेत, असेही कंगनाने शिवसेना नेतृत्वाचे नाव न घेता म्हटले.
चंदिगडला उतरल्यानंतर माझी सुरक्षाव्यवस्था नाममात्र करण्यात आली आहे. लोक आनंदाने अभिनंदन करत आहेत. या वेळी वाचले, असेच वाटत आहे. एक काळ होता जेंव्हा मुंबईत आईच्या पदराची ऊब जाणवायची. आता अशी स्थिती आहे की, जीव वाचला तरी पुरे. शिवसेनेची सोनिया सेना होताच मुंबईत आतंकी प्रशासनाचा बोलबाला झाल्याचा आरोपही कंगनाने टिष्ट्वट करत केला.

Basic problem of Maharashtra CM is why I exposed movie mafia, murderers of SSR and its drug racket, who his beloved son Aaditya Thakeray hangs out with, this is my big crime so now they want to fix me, ok try let’s see who fixes who!!! https://t.co/KzfVPfx5s8
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 14, 2020

Loading...

महत्वाच्या बातम्या :-

बाळासाहेबांचा व्हिडिओ शेअर करत कंगनाचा पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्ला
उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख पडला महागात ; अब्रूनुकसानीचा कंगनाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल
कंगना सोडून आता कोरोनाकडे लक्ष द्या ; फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला
फडणवीस मुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांचा एकेरी उल्लेख खपवून घेतला नसता : जयंत पाटील
शिवसेना दाऊदला घाबरते ; रामदास आठवलेंचा खळबळजनक आरोप !

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. आदित्यसोबत असलेली मंडळी उघडी पडल्याने मुख्यमंत्री माझ्याविरोधात गेलेत ; कंगनाचा शिवसेनेवर निशाणा InShorts Marathi.

Loading...

राज्यात ऑक्सिजनचं चिंता मिटली ! ठाकरे सरकारने घेतला महत्वाचा निर्णय !!

Previous article

मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा पद्धतशीर वापर केला जातोय – शिवसेना

Next article

You may also like

Comments

Comments are closed.