मुख्य बातम्या

शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत मोदींनी शरद पवारांशी बोलायला काय हरकत होती? शिवसेनेकडून मोदींना ‘गुरूं’ची आठवण

0

केंद्राने संसदेत तीन शेतकरी विधेयकं मंजुर केली आणि त्यांनंतर जो विरोध होतोय हाच मुद्दा आजच्या शिवसेनेचे मुखपत्र दैनिक ‘सामना’त मांडण्यात आला आहे. तसेच शिरोमणी अकाली दलच्या खासदार हरसिमरत कौर यांनी आपल्या मंत्रीपादाचा दिला. त्यांच्या राजीनाम्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत केंद्राला जाग आली तर बरंच आहे, नाहीतर सगळ्यांना एकत्र यावेच लागेल असं आवाहनही करण्यात आले.  ‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर टीका करपवार आहे.

‘मोदी सरकारची आर्थिक, व्यापार, कृषीविषयक धोरणे शंका निर्माण करणारी आहेत. शेतकऱ्यांच्या भवितव्याबाबत निर्णय घेताना देशातील दोन-चार प्रमुख शेतकरी नेत्यांशी चर्चा करायला काय हरकत होती? निदान  शरद पवार यांच्यासारख्या नेत्याशी तरी बोलून घ्यायला हवे होते, पण ‘संवाद’, ‘चर्चा’ या शब्दांशी केंद्र सरकारचा काहीच संबंध उरलेला नाही’ असं म्हणत शिवसेनेनं मोदी सरकारवर कडाडून टीका केली.

आज शेतकरीवर्गात अन्यायाची भावना आहे.  जो देश आजही कृषीप्रधान म्हणून ओळखला जातो, त्या देशातील शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक राजकीय पक्ष या ना त्या प्रश्नावरुन शेतकऱ्यांच्याच प्रश्नांवर बोलतो आहे. अनेक पुढाऱ्यांना खुर्च्या मिळाल्या आणि राजकीय पक्षांना सत्ता मिळाल्या. किसानपूत्र म्हणवून घेणारे कित्येक जण मुख्यमंत्री, पंतप्रधान व राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले, पण देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती कधीच सुधारली नाही, अशी खंत शिवसेनेने व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-

राज्यात सप्टेंबर अखेर शाळा सुरू होण्याची शक्यता कमी ; शिक्षणमंत्र्यांचा मोठा खुलासा
वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे ‘या’ जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून पुन्हा लॉकडाऊनची मागणी
पुण्यात मास्क न घालणाऱ्यांकडून वसूल केला तब्बल 25 लाख रुपयांचा दंड
मुंबईत येत्या काही आठवड्यांमध्ये भयंकर पसरेल कोरोना !
दारुप्रमाणे मंदिरातून महसूल मिळाला असता तर मंदिरं उघडली असती ; भाजपचा आरोप

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत मोदींनी शरद पवारांशी बोलायला काय हरकत होती? शिवसेनेकडून मोदींना ‘गुरूं’ची आठवण InShorts Marathi.

अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय ! लोकलच्या १५० फेऱ्या वाढवल्या !!

Previous article

शेतकऱ्यांसमोर मोदी सरकार झुकले ; पाच दिवसातच कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे?

Next article

You may also like

Comments

Comments are closed.