Royal Entertainmentमुख्य बातम्या

टीआरपी म्हणजे काय? टीव्ही चॅनेलला पहिला क्रमांक बनवण्यामध्ये टीआरपीची भूमिका काय असते? जाणून घ्या सविस्तर…

0

सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा मुद्दा उचलून धरताना रिपब्लिक टीव्ही चॅनेल ने मुंबई पो’लि’सांवर आ’रो’प केले. आणि त्यामुळे मुंबई पो’लि’सां’नी रिपब्लिक आणि बाकी सगळ्याच मीडियाची कसून चौकशी सुरू केली. त्यातच काही दिवसांपूर्वी मुंबई पो’ली’स आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या खळबळजनक खुलास्यानंतर टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट (टीआरपी-TRP) चर्चेचा विषय बनला आहे.
मागच्या आठवड्यात गुरुवारी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत परमबीर सिंग म्हणाले की, मुंबई पो’लि’सां’नी एक नवीन रॅकेट उघडकीस आणले आहे. ‘ फॉल्स टीआरपी रॅकेट ‘ असे या रॅकेटचे नाव आहे. टीआरपीच्या हाताळणीत घोटाळ्याचा तपास मुंबई पोलिस सध्या करत आहेत.
पण टीआरपी ही नेमकं काय भानगड आहे ? असा प्रश्न अनेकांच्या मनात पडला असेल. चला तर मग जाणून घेऊयात ” टीआरपी ” म्हणजे काय ? आणि चॅनेल नंबर एक बनविण्यात तिची भूमिका काय आहे ….
टीव्ही चॅनेलची टीआरपी म्हणजे काय? दूरदर्शन रेटिंग पॉइंट किंवा टीआरपी हे एक असं साधन आहे, की ज्याच्या द्वारे कोणता प्रोग्राम किंवा टीव्ही चॅनेल सर्वात जास्त पाहिला जातो, हे शोधलं जातं.. एकंदरीत कोणत्याही प्रोग्राम किंवा चॅनेलची लोकप्रियता किती आहे ? हे समजण्यास मदत करते. म्हणजेच लोक चॅनेल किंवा प्रोग्राम किती वेळा आणि किती काळ पाहत आहेत ? ज्या कार्यक्रमाची सर्वाधिक टीआरपी असते म्हणजे त्यांचा सर्वांत जास्त प्रेक्षक वर्ग तो कार्यक्रम पाहत असतो.
टीआरपी डेटा जाहिरातदारांसाठी खूप उपयुक्त असतो. कारण जाहिरातदार केवळ अशाच ठिकाणी जाहिरात ठरवतात, ज्यांच्याकडे जास्त टीआरपी असतो. टीआरपी मोजण्यासाठी, काही ठिकाणी ‘पीपल मीटर’ स्थापित केले आहे. ज्या हजार दोन हजार प्रेक्षकांच्या घरी हे मीटर लावलेले आहेत, त्या प्रेक्षकांच्या चॅनेलच्या आवडी निवडीच्या आधारे सर्व प्रेक्षकांचा विचार केला जातो.
टीआरपी कसा ठरविला जातो? या मीटरच्या माध्यमातून टीव्हीची प्रत्येक मिनिटांची माहिती मॉनिटरिंग टीम, भारतीय टेलिव्हिजन प्रेक्षकांचे मोजमापावर (इंटक) वर पुरविली जाते. पीपल मीटर कडून आलेल्या माहितीवर अभ्यास केल्यानंतर ही टीम कोणत्या चॅनेल किंवा प्रोग्रामला जास्त काळ रोज पाहिलं जातं यावरून टीआरपी ठरवते.
याचं मोजमाप करण्यासाठी, प्रेक्षक एखादा चॅनेल किती नियमितपणे पाहतोय ? त्यातला कार्यक्रम किती वेळ पाहतोय ? हे सतत रेकॉर्ड केलं जातं. त्या नंतर चॅनेलच्या कार्यक्रमाची सरासरी रेकॉर्ड हा डेटा 30 ने गुणाकार करून काढला जातो. हे पीपल मीटर कोणत्याही चॅनेल आणि त्याच्या प्रोग्रामबद्दल संपूर्ण माहिती काढते. अश्या प्रकारे टीआरपी काम करते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
The post टीआरपी म्हणजे काय? टीव्ही चॅनेलला पहिला क्रमांक बनवण्यामध्ये टीआरपीची भूमिका काय असते? जाणून घ्या सविस्तर… appeared first on STAR Marathi News.

या हॉस्पिटलमध्ये झाला नवरात्रीचा चमत्कार, घटस्थापनेच्या दिवशी घडला हा चमत्कार, जाणून घ्या संपूर्ण बातमी…

Previous article

जीवनात फक्त ‘या’ गोष्टी आचरणात आणा, मग येतील सोन्याचे दिवस, नाही तर होईल मोठे नुकसान…

Next article

You may also like

Comments

Comments are closed.