Royal politicsटॉप पोस्ट

जम्मू-काश्मीरच्या लोकांना विशेष दर्जा देणारे आर्टिकल 35 A नक्की आहे तरी काय ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

0

जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना विशेष अधिकार देणाऱ्या 35 A ला हटवण्यावरून बराच गोंधळ सूरू आहे. आज झालेल्या सुप्रीम कोर्टातील सुनावणी स्थगित करण्यात आली असून, या आर्टिकलची पुढील सुनावणी सुप्रीम कोर्टाने 27 आॅंगस्टला ढकलली आहे.

आर्टिकल 35 A जम्मू-काश्मीरमधील स्थानिक लोकांना विशेष आधिकार देतो. या आर्टिकलविषयी दिल्ली येथील एनजीओ वुई दी सिटिझन्सने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांचे म्हणणे आहे की, आर्टिकल 35 A हे असवैंधानिक असून हे फक्त तात्पुरत्या स्वरूपाचे होते आणि ते रद्द करण्यात यावे.

Loading...

या आर्टिकलवरून जम्मू-काश्मीरमध्ये बंद पाळण्यात आला असून, 35 A च्या समर्थकांनी देखील दोन दिवसांचा बंद पुकारला आहे

आर्टिकल 35 A विषयी जाणून घ्या संपूर्ण माहिती –


काय आहे आर्टिकल 35 A ?


आर्टिकल 35 A, आर्टिकल 370 चा भाग आहे. आर्टिकल 35 अ नुसार जम्मू-काश्मिरचा नागरिक तेव्हाच राज्याचा हिस्सा समजला जाईल, जेव्हा त्याचा जम्मू-काश्मिरमध्ये जन्म झाला असेल.

जम्मू-काश्मिरमध्ये दुसरा कोणताच नागरिक संपत्ती, जमीन विकत घेऊ शकत नाही. तसेच तेथील स्थानिक नागरिक देखील होऊ शकत नाही.


मग प्रश्न असा प़डतो की, स्थानिक नागरिक कोण ?


1956 मध्ये जेव्हा जम्मू-काश्मीरचे संविधान बनवले, त्यामध्ये स्थानिक नागरिकतेची परिभाषा सांगण्यात आली.

जम्मू-काश्मिरच्या संविधानानूसार स्थानिक नागरिक तोच असेल जो, 14 मे 1954 ला राज्याचा नागरिक असेल. अथवा त्याआधी पासून 10 वर्ष तो राज्यात राहत असेल आणि त्याने तेथे काही संपत्ती घेतली असेल.

सोप्या भाषेत सांगायचे तर, आपण भारतातील कोणत्याही राज्यात जाऊन, तेथील संपत्ती, जमीन विकत घेऊ शकतो. घर घेऊ शकतो. तसेच त्या राज्यातील नागरिक देखील होऊ शकतो. मात्र जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन तुम्ही तेथील जमीन विकत घेऊ शकत नाही. तेथील नागरिक होऊ शकत नाहीत. आर्टिकल 35 A हे करण्यापासून तुम्हाला अडवते. आर्टिकल 35 A लागू असणारे जम्मू-काश्मीर एकमेव असे राज्य आहे.

त्याही पेक्षा एक विचित्र गोष्ट म्हणजे, जम्मू-काश्मीरमधील लोकं भारतात कोठेही जमीन विकत घेऊ शकतात. मात्र त्यांच्या राज्यामध्ये  देशाचा कोणताही नागरिक जमीन विकत घेऊ शकत नाही.

– आर्टिकल 35 A मुळे जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या अनेक दशकांपासून राहणाऱ्या अनेक लोकांना त्यांचे अधिकार मिळालेले नाहीत.

– 1947 मध्ये पश्चिम पाकिस्तान सोडून जम्मूमध्ये आलेले अनेक हिंदू परिवार आजही शरणार्थी आहेत. आकडेवारीनूसार 1947 ला जम्मूमध्ये 5 हजार 764 परिवार आले होते. यामध्ये 85% दलित होते. या कुटूंबाना आजपर्यंत अधिकार मिळाले नाही.

-आर्टिकल 35 A मुळे ही लोकं सरकारी नौकरीमध्ये देखील जाऊ शकत नाही. तसेच यांची मुले देखील व्यावसायिक शिक्षा देणाऱ्या सरकारी संस्थेत अॅडमिशन देखील घेऊ शकत नाही.

-बाहेरील नागरिक लोकसभेच्या निवडणूकीत वोट देऊ शकतो. मात्र राज्यातील स्थानिक निवडणूकीत तो वोट देऊ शकत नाही.


मुलींचे हक्क – 


आर्टिकल 35 A नूसार जर जम्मू-काश्मिरमधील एखादी मुलगी बाहेरच्या राज्यातील एखाद्या मुलाशी लग्न करते तर तिचे सर्व अधिकार संपुष्टात येतात. तसेच तिच्या मुलांचे अधिकार देखील संपूष्टात येतात.


कधी लागू करण्यात आले आर्टिकल 35 A ?


तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि त्यावेळेसचे जम्मू-काश्मीरचे पंतप्रधान शेख अब्दुल्ला यांच्यात दिल्लीत 1952 मध्ये झालेल्या करारानुसार राज्यघटने काही तरतुदी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या आदेशाने १९५४ मध्ये करण्यात आल्या. त्या वेळी आर्टिकल ३५ A राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले.

जम्मू-काश्मीर या राज्याला स्वतःची राज्यघटना असून ती १९५६ मध्ये तयार करण्यात आली आहे.


या आर्टिकलला विरोध का ?


आर्टिकल 35 A रद्द झाल्यास जम्मू-काश्मीरची विशेष राज्याची ओळख लोप पावेल, अशी भिती काही राजकीय पक्षांना वाटते. जम्मू-काश्मीर हे मुस्लिम बहुल राज्य आहे.

जर आर्टिकल 35 A रद्द केले तर अनेक हिंदू धर्मिय लोकं काश्मिरमध्ये जमिनी घेतील व तेथील नागरिक होती. अशी भिती काही राजकीय पक्षांना आणि फुटीरतावाद्यांना वाटते. यामुळे अनेक लोकं या अर्टिकलच्या बाजूने आहेत. तर काही लोकं याला विरोध करतात.


सध्या चर्चेत का आहे ?


2014 साली वुई द सिटिझन या एनजीओने या आर्टिकलच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.  त्यांचे म्हणणे आहे की, आर्टिकल 35 A  हे असंवैधानिक असून हे फक्त तात्पुरत्या स्वरूपाचे होते आणि ते आता रद्द करण्यात यावे.

सध्या सुप्रीम कोर्टात या आर्टिकलवर सुनावणी सुरू आहे.

Loading...

Loveratri Trailer :- 9 दिवस 9 रात्रीची लवस्टोरी ठरेल का बॉक्स ऑफिसवर सुपरहिट

Previous article

राज्यसभेत ‘उपसभापतीं’च्या पदासाठी भाजप आणि विरोधकांमध्ये कडा मुकाबला, निवडणूक 9 ऑगस्टला

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *