Royal politicsटॉप पोस्ट

मी तुम्हाला माझा आधार कार्ड नंबर देतो; माझी माहिती हॅक करून दाखवा-‘ट्राय’ चेअरमन आर. एस. शर्मा

0

सरकारकडून सतत आधारकार्ड जोडणी सक्तीची करण्यात येत असताना काल टेलीकॉम रेग्युलेटरी अॉथेरीटी ऑफ इंडिया (ट्राय) चे चेअरमन आर. एस. शर्मा यांनी शनिवारी सोशल मीडियावर एक चॅलेंज दिले की, कोणीही माझी संपूर्ण माहिती आधार कार्ड च्या क्रमांकावरून मिळवून मला धोका निर्माण करून दाखवा. माझ्या पॅन कार्ड नंबर पासून माझ्या मोबाइल नंबर पर्यंतची संपूर्ण माहिती उघड करून दाखवा असे ओपन चॅलेंज दिले.

आर. एस शर्मा यांचे हे चॅलेंज स्वीकारून अनेक हॅकर्स पुढे आले आणि त्यांनी आर. एस शर्मा याची सर्व वैयक्तिक माहिती हॅक झाली असल्याचे सांगत त्यांची माहिती त्यांना दिली देखील. ट्वीटर वर अॅक्टिव काही हॅकर्सनी त्यांना त्यांचा मोबाइल नंबर, फोटोग्राफ, घरचा पत्ता, जन्मतारीख अशी माहिती उघड केल्याचा दावा करीत त्यांना ही माहिती रिट्विट केली.

Loading...

आम्ही देखील त्याची पडताळणी केल्यावर या हॅकर ने काढलेली माहिती कुठे कुठे उपलब्ध आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला. यात हे स्पष्ट झाले की हॅकर ने दिलेली आर. एस शर्मा यांची संपूर्ण माहिती ही गव्हर्नमेंटच्या वेबसाइट वर उपलब्ध आहे. https://dopt.gov.in/welfare/generalrecent-circular  या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

पीटीआय ने आर. एस शर्मा यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी यावर कोणतेही वक्तव्य न देता, हे चॅलेंज अजून काही वेळ असेच चालू राहील असे संगितले.

शर्मा यांनी ट्वीटरवर चॅलेंज दिले की, हा माझा आधार कार्ड क्रमांक आहे- 7621 7768 2740 .  आता मी तुम्हाला एक चॅलेंज देतो की, मला एक ठोस कारण द्या ज्याने तुम्ही मला धोका पोहचवू शकतात.

शर्मा यांनी दिलेले चॅलेंज चे ट्विट तब्बल 1197 वेळा रिट्विट करण्यात आले. तर या ट्विटला 1864 लाइक आहेत. रात्री उशीर पर्यंत या चॅलेंज वर बरेच दावे प्रतिदावे करण्यात आले.

माहिती हॅक झाली असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर शर्मा यांनी ट्विट केले की, ‘मी त्यांना माझा मोबाइल नंबर आणि इतर माहिती देण्याचे चॅलेंज दिले नव्हते, मी त्यांना या माहितीच्या आधारावर मला धोका पोहचवण्याचे चॅलेंज दिले होते. त्यांना त्यात काही जास्त यश आल्याचे दिसत नाही. त्यांना शुभेच्छा.’

शर्मा हे यूआयडीएआय (युनिक आयडेंटिफीकेशन अॉथेरीटी ऑफ इंडिया) चे माजी संचालक होते. आणि ते आधार योजनेचे समर्थन करतात.  त्यांनी पुढे ट्विट केले की, ‘डिजिटल जगात माहिती गोपनीयता अत्यंत मोठी आणि महत्वाची समस्या आहे. आणि मी देखील त्याच्या समर्थनात आहे. परंतू माझे एवढेच सांगणे आहे की आधार कोणत्याही गोपनीय महितीचा भंग करत नाही.’

या आधी अशा अनेक घटना घडल्या आहेत की आधार ची माहिती बाहेर अत्यंत कमी पैशात उपलब्ध होते. मागील वर्षी एका वृत्तपत्राच्या महिला पत्रकाराने ही माहिती उघड केली होती.

(IMAGE INPUT- TWITTER)

Loading...

असा देश जेथे बुट पाॅलिश करायला लागतात 4 लाख रूपये

Previous article

आसाममधील 40 लाख लोक होऊ शकतात बेघर? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *