Royal politicsटॉप पोस्ट

पश्चिम बंगालचे नाव बदलून आता ‘बांग्ला’ होणार? ममता सरकारची प्रस्तावाला मंजुरी

0

बंगाली मिठाई आणि बंगाली गोड बोलीसाठी प्रसिद्ध असलेल्या बंगालचे (पश्चिम बंगालचे) नाव आता बदलणार आहे? हो पश्चिम बंगालचे नाव आता लवकरच बदलून ‘बांग्ला’ करण्यात येणार आहे.

पश्चिम  बंगालचे नाव बांग्ला करण्यासंबंधित प्रस्ताव पश्चिम बंगालच्या विधानसभेत आणण्यात आला होता. आणि राज्याच्या विधानसभेने हा प्रस्ताव पारित देखील केला आहे. आता हा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयात मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने या निर्णयाला जर हिरवा कंदील दाखवला जर पश्चिम बंगालचे ‘बांग्ला’ असे बदलण्यात येईल.

Loading...

याआधी देखील राज्याचे नाव बद्दलण्यासाठीचा प्रस्ताव ममता बॅनर्जी सरकारकडून ऑगस्ट 2016 रोजी विधानसभेत मांडून पारित करण्यात आला होता. त्यावेळी राज्यशासनाकडून पश्चिम बंगालचे नाव बदलून ते इंग्लिशमध्ये बंगाल, हिंदीमध्ये बंगाल आणि बंगालीमध्ये बांग्ला असे करण्यात यावे असा प्रस्ताव केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. परंतू केंद्र सरकार कडून हा प्रस्ताव नामंजूर करणात आला होता.

यावर केंद्राकडून स्पष्टीकरण देण्यात आले की, एकाच राज्याचे तीन वेगवेगळ्या भाषेत तीन वेगवेगळे नावे नसू शकतात.

त्यावर केंद्रसरकारकडून काही सूचना देखील देण्यात आल्या की, पश्चिम बंगाल सरकारने तीन पैकी कोणते तरी एक नाव सुचवावे आणि त्यावर निर्णय घ्यावा.यानुसार काल गुरुवारी ममता बॅनर्जी सरकारकडून बांग्ला नाव सुचवून त्यावर विधेयक पारित केले आहे आणि ते आता केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे.

या प्रस्तवाला केंद्राकडून मान्यता मिळाली तर पश्चिम बंगाल बांग्ला म्हणून ओळखले जाईल.

Loading...

‘फॉर्च्यून अंडर 40’ च्या यादीत 3 भारतीय महिलांचा समावेश

Previous article

पाकिस्तानचे पंतप्रधान होऊ शकणारे इम्रान खान भारताबद्दल हा विचार करतात

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *