मुख्य बातम्या

महाराष्ट्रातल्या श्रीमंत मराठा आमदारांना आरक्षण नकोय ; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

0

महाराष्ट्रातील श्रीमंत मराठा आमदारांना त्यांच्या समाजासाठी आरक्षण नको आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यांनी ट्विट करून यासंदर्भातील आपली भूमिका मांडली आहे.
यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, ‘महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरीब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत. गरीब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा. अन्यथा त्यांना आरक्षणावर पाणी सोडावे लागेल’ असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरिब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत. गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा,अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावं लागेल. pic.twitter.com/cPqRise2q7
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) September 13, 2020

काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा खटला घटनापीठाकडे वर्ग केला होता. मात्र, यावेळी न्यायालयाने राज्यातील मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली होती. त्यामुळे या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे.
महत्वाच्या बातम्या :-

कंगना प्रकरणावरून शरद पवारांनी शिवसेनेचे कान टोचले? राऊतही नरमले
10 दिवसात मंदिर उघडली नाही तर पुन्हा पंढरपुरात येऊ ; आंबेडकरांचा सरकारला इशारा
लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे प्रकाश आंबेडकरांविरुद्ध पंढरपूरात गुन्हा दाखल
स्वत: विठ्ठल मंदिरात प्रवेश करणारच’ प्रकाश आंबेडकर कडाडले
सरकारला हवे तसे सल्लागार मिळाले नाहीत ; प्रकाश आंबेडकरांची सडकून टीका

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. महाराष्ट्रातल्या श्रीमंत मराठा आमदारांना आरक्षण नकोय ; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप InShorts Marathi.

फडणवीसांनी राज्यपालपदाची ऑफर दिली होती ; खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

Previous article

राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या चिराग पासवानांवर रोहित पवार चिडले

Next article

You may also like

Comments

Comments are closed.