मुख्य बातम्या

‘कोहली’ होणार का मास्टर ब्लास्टर? सर्वात जलद दहा हजार धावांचा विश्वविक्रम

0

विशाखापट्टणम क्रिकेट मैदानावर  भारत आणि वेस्ट वेस्टइंडीज यांच्यामधील सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने  81 धावांची खेळी करत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 205 डावात दहा हजार धावांचा टप्पा पार केला.

सर्वात कमी डावात दहा हजार धावा करणारा करणारा विराट जगातला पहिलाच खेळाडू ठरला.

Loading...

यापूर्वी भारताकडून सौरभ गांगुली, सचिन तेंडुलकर ,राहुल द्रविड यांनी दहा हजार धावांचा टप्पा पार केला असून दहा हजार धावा करणारा विराट त्यांच्या पाठोपाठ चौथा भारतीय खेळाडू ठरला.

विराट कोहलीने 213 एकदिवसीय सामन्यात 59.17 च्या सरासरीने 10000 धावा केल्या आहेत.

योगायोग म्हणजे या धावांचा साक्षीदार ठरला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी. दोन्हीकडेही दहा हजार धावा करण्याची सुवर्णसंधी आहे.  आता प्रेक्षकांना प्रतीक्षा ती धोनीच्या दहा हजार धावांची.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

सलामीवीर रोहित आणि शिखर स्वस्तात बाद झाल्यानंतर अंबाती रायडूला साथीला घेत कर्णधार विराट कोहलीने भारताचा डाव सावरला. या दोघांनी 139 धावांची भागीदारी केली.

Loading...

बहुगुणकारी कडुनिंब, सर्व विकृतींना कडू रस हा प्रतिबंधक आणि उपचारक

Previous article

भारतावर सागरीमार्गाने दहशतवादी हल्ला करण्याचा कट, गुप्तचर यंत्रणेचा सावधानतेचा इशारा

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *