मुख्य बातम्या

Virat Birthday Special :- क्रिकेटच्या ‘सम्राटचे’ तिशीत पदार्पण आणि रचलेले अनमोल रेकॉर्ड

0

क्रिकेट विश्वात सुरुवातीपासूनच भारतीय फलंदाजांनी भारताला क्रिकेट जगतात वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे.

लिटिल मास्टर सुनील गावस्कर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, द वॉल राहुल द्रविड, बंगालचा टायगर सौरभ गांगुली, व्हेरी-व्हेरी स्पेशल लक्ष्मण या फलंदाजांनी आपापल्या काळात केलेल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय क्रिकेटचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले.

Loading...

सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, व्ही.व्ही.एस लक्ष्मण अशा अनेक दिग्गज फलंदाजानंतर यांचा वारसदार कोण हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात फार काळ राहिला नाही.

5 नोव्हेंबर 1988 साली देशाच्या राजधानीत जन्मलेल्या बालकाने क्रिकेट विश्वात आपल्या नावाचे विराट  वादळ असे काही घोंगावले की क्रिकेट चाहत्यांच्या  साऱ्या प्रश्नांची उत्तरे न देताच मिळू लागली. याबरोबर दिग्गजांचा वारसदार कोण? हा प्रश्न इतिहास जमा झाला.

(Virat Kohli)

(Virat Kohli)

रणजी क्रिकेट सामन्यात कर्नाटक विरुद्ध दिल्ली संघाकडून खेळत असताना विराट कोहलीच्या वडिलांचे निधन झाले होते. मात्र दिल्ली संघ संकटात असल्यामुळे त्याने खेळण्याचा निर्णय घेतला आणि 90 धावांची खेळी करून वडिलांना अनोखी आदरांजली वाहिली होती. त्या वेळी अनेक दिग्गजांनी विराटचे कौतुक केले होते.

2008 साली मलेशियात झालेल्या 19 वर्षाखालील विश्वचषकात विराट कोहलीची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. हा विश्वचषक आपल्या नावावर करत विराट कोहलीने भारतीय संघात स्थान मिळवण्याची पहिली पायरी चढली.

19 वर्षाखालील झालेल्या विश्वचषकानंतर काही महिन्यातच श्रीलंकेविरुद्ध विराट कोहलीने भारताच्या एकदिवसीय संघात पदार्पण केले.

18 ऑगस्ट 2008 साली श्रीलंकेविरुद्ध दाम्बुला मैदानावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या विराट कोहलीने पुढे क्रिकेटच्या सर्व प्रकारात अनेक अशक्यप्राय रेकॉर्डस् आपल्या नावावर करत क्रिकेटचा ‘सम्राट’ म्हणून ओळख निर्माण केली.

विराट कोहलीचे काही खास रेकॉर्डस् –

विराट कोहलीने 216 एकदिवसीय सामने खेळले असून 59.83 च्या विक्रमी सरासरीने 10 हजार 232 धावा केल्या आहेत.यामध्ये 38 शतकांचा तर 48 अर्धशतकांचा समावेश आहे.

सर्वात कमी डावात 10 हजार धावांचा टप्पा गाठणारा विराट जगातला एकमेव खेळाडू ठरला असून त्याच्यानंतर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा नंबर लागतो.

प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये 183 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या असून कोणत्याही भारतीय खेळाडूने केलेली पाकिस्तान विरुद्धची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.

रनमशीन विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करताना 75 डावात 98.25 च्या विक्रमी सरासरी 4 हजार 716 धावा केल्या असून 27 वेळा नाबाद राहण्याचाही पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा विराट कोहली जगातला एकमेव खेळाडू आहे.

विराट कोहलीने 117 डावात धावांचा पाठलाग करताना 23 शतके केली असून अशी कामगिरी करणारा विराट जगातला एकमेव खेळाडू आहे. विराटने या 117 डावात 68. 97 च्या सर्वोत्तम सरासरीने 6139 धावा केल्या आहेत. यात 28 अर्धशतकांचाही समावेश आहे.

विराट कोहलीने आतापर्यंत 73 कसोटी सामने खेळले असून 54.57 च्या सरासरीने 6 हजार 331 धावा केल्या आहेत. यात 24 शतके तर 19 अर्धशतके झळकावली आहेत. 243 ही विराटची कसोटीमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.

62 टी ट्वेंटी सामन्यांमध्ये विराट कोहलीने 48.88 च्या विक्रमी सरासरीने 2 हजार 102 धावा केल्या आहेत. यात 18 अर्धशतकांचा समावेश आहे. तर नाबाद 90 ही विराटची सर्वोच्च धावसंख्या आहे.

भारतामध्ये 2011 साली झालेल्या विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात बांगलादेशा विरुद्ध ढाका मैदानावर विराट कोहलीने आपल्या पहिल्याच विश्वचषकात नाबाद 100 धावांची खेळी केली होती. अशी कामगिरी करणारा विराट भारताचा एकमेव खेळाडू आहे.

2011 मध्ये झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सचिन आणि सेहवाग लवकर बाद झाल्यानंतर वानखेडे मैदानावर विराट कोहलीने गंभीर समवेत 85 धावांची भागीदारी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

विराट कोहलीने सलग तीन एकदिवसीय सामन्यातून तीन शतके करण्याचा पराक्रम केला आहे.यापूर्वी कोणत्याही कर्णधाराला तीन सामन्यात सलग तीन शतके करता आली नाहीत. अशी कामगिरी करणारा विराट जगातला एकमेव खेळाडू आहे. विराटने सलग 3 डावांमध्ये 115, 141, 147 अशी शतके ठोकली होती.

विराट कोहलीने 2013 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध जयपुर मध्ये खेळलेल्या एकदिवसीय सामन्यात 52 चेंडूत शतक झळकावत सर्वात जलद शतक करण्याचा मान मिळवला. त्यापूर्वी वीरेंद्र सेहवागने 60 चेंडूत शतक झळकावले होते.

विराट कोहलीला 2015 साली ब्रिटिश मासिक स्पोर्ट्स पोलो कडून मोस्ट मार्केटेबल प्लेयर या यादीमध्ये सहावे स्थान देण्यात आले होते.

विराटला मिळलेले पुरस्कार – 

विराट कोहलीला आयसीसीने अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. आयसीसीने विराट कोहलीचा ‘सर गारफिल्ड सोबर्स’ ट्रॉफी देऊन सन्मान केला.

विराट कोहलीने 2012 आणि 2017 ला आयसीसीचा ‘प्लेयर ऑफ द इयर’ चा किताब मिळवण्याचा पराक्रम केला आहे. त्याचबरोबर 2016 2017 चा ‘विस्टन लिडींग क्रिकेटर इन द वर्ल्ड’ ने सन्मानित करण्यात आले.

virat kohli

भारत सरकार कडुन 2013 मध्ये विराटला ‘अर्जुन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर 2017 ला ‘पद्मश्री’,त्याचबरोबर खेळातला सर्वोत्तम पुरस्कार 2018 ला ‘राजीव गांधी खेळरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

वयाच्या तिसाव्या वर्षी विराट कोहलीने खेळात जेवढी महारथ मिळवली आहे तेवढी जगातल्या कोणत्याही खेळाडूला मिळाली नसून येणाऱ्या काळात विराट कोहली जगातला सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरणार यात कोणाचीही मनात शंका असेल तर नवलच.

Loading...

इस्लाममधील महिलांनी नेल पॉलिश लावू नये असा ‘देवबंद’चा अजब फतवा जारी

Previous article

पाकिस्तानच्या खेळाडूने मोडला ‘किंग कोहलीचा’ विक्रम

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *