Royal politicsमहाराष्ट्रमुख्य बातम्या

माढ्याचा तिढा : प्रभाकर देशमुख शर्यतीत, विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या डोकेदुखीत वाढ 

0

टीम महाराष्ट्र देशा- शरद पवार यांनी नेतृत्व केलेला मतदारसंघ म्हणून माढा मतदारसंघांची ओळख आहे. मोदी लाटेतसुध्दा या मतदारसंघांने राष्ट्रवादीला साथ दिली होती. त्यामुळे या मतदारसंघांच्या उमेदवारीसाठी चांगलीच रस्सीखेच आहे. माढा लोकसभा निवडणुकीसाठी विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे इच्छुक आहेत. पण, आता सेवानिवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनीही उमेदवारीची तयारी चालविल्याने तिढा निर्माण झाला आहे.

देशमुख यांच्यामागे मोहिते – पाटील यांच्या विरोधकांची खेळी आहे का, यादृष्टीनेही पाहिले जात आहे. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते – पाटील यांची जन्मशताब्दी शासनाच्या वतीने साजरी केली जात असून यानिमित्ताने पाटील यांची भाजपशी जवळीक वाढली असल्याचे काहींनी पवारांच्या कानावर घातले आहे. माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी द्यावी, असा एक मतप्रवाह पक्षात आहे. तर, मोहिते – पाटील यांचे पवार यांच्याशी असलेले संबंध पाहता तेच उमेदवारीचे दावेदार होऊ  शकतात, असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. या तिढय़ात पवार विद्यमानांना पसंती देणार की भाकरी फिरवणार याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.

Loading...

माढा हा राष्ट्रवादीसाठी सुरक्षित मतदारसंघ आहे. माण, फलटण, सांगोला, माळशिरस, करमाळा, माढा या विधानसभा मतदारसंघांत समावेश होतो. २००९ साली शरद पवार यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. २०१४ साली मोदी लाटेत अटीतटीच्या लढतीत येथून विजयसिंह मोहिते-पाटील विजयी झाले होते.

कोणाच्या जाण्याने पक्ष संपत नसतो, तारिक अन्वर यांना टोला प्रफुल्ल पटेल यांचा टोला

Loading...

सांगली : शिवप्रतिष्ठानची ‘दुर्गामाता दौड’ सुरु

Previous article

रमेश कदमांचा पाय आणखी खोलात; कदम यांच्यावरील दोषारोपाला मंत्रिपरिषदेची मान्यता

Next article

You may also like

Comments

Comments are closed.