Royal Entertainmentमुख्य बातम्या

विद्या बालनची बहीण आहे प्रसिद्ध अभिनेत्री, बोल्ड सीन्स देण्यात तिचाही आहे हातखंडा

0

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की विद्या बालन बॉलिवूडमधील एक सुप्रसिद्ध नाव आहे. आणि आज आपण तिच्या चुलत बहिणीबद्दल जाणून घेणार आहोत.
आपणास माहित आहे की तिची एक चुलत बहीण देखील आहे जीच्याकडून विद्या चित्रपट आणि अभिनयाच्या टिप्स घेते. त्या बहिणीचे नाव आहे प्रियामणि, ज्यांनी दक्षिण फिल्म इंडस्ट्रीमध्ये बरेच नाव कमावले आहे. प्रियामनीच्या वडिलांचे नाव वासुदेव मणी अय्यर आणि आईचे नाव लता अय्यर आहे.
अभिनयाचा वारसा मिळाला नसतानाही प्रियामनीने आपल्या कौशल्याच्या जोरावर चित्रपटांमध्ये एक वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. आज ती दक्षिणच्या प्रमुख नायिकांमध्ये गणली जाते. तिच्या वडिलांचा प्लांटेशन चा व्यवसाय आहे तर आई माजी राष्ट्रीय बॅडमिंटनपटू आहे.
प्रियामनीने तिच्या कारकिर्दीची सुरूवात फ्लॉप चित्रपटाद्वारे केली पण त्याचा प्रियामणिच्या यशावर परिणाम झाला नाही. ती सतत चित्रपट शोधत राहिली. प्रियामनीने ‘बाहुबली’ चे दिग्दर्शक एस.एस. राजामौलीबरोबरही काम केले होते. हळूहळू ती इतकी यशस्वी झाली की लोक तिला लंबी रेस घोडाच मानू लागले.
प्रियामणि यांना 2007 मध्ये आलेल्या ‘पारूतीविरन’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.आज प्रियामणि स्टारडमचा आलम असा आहे की विद्या बालनही तिच्या चित्रपटांबद्दल तिचे मत घेते. प्रियामणिने केवळ दक्षिणच नव्हे तर बॉलिवूडमध्येही काम केले आहे.
मणिरत्नमच्या ‘रावण’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तथापि, हा चित्रपट फ्लॉप होता आणि प्रियामनीसुद्धा काही खास कमाल दाखवू शकली नाही. पण दक्षिणेत विद्या बालनची बहीण खूप नाव कमावत आहे. तिची हॉटनेस साऊथ फिल्म इंडस्ट्रीत चांगलीच गाजली आहे.
प्रियामनी चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वी मॉडेलिंग करायची. वयाच्या 12 व्या वर्षी प्रियामणि यांनी ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. तामिळ व्यतिरिक्त प्रियामनीने मल्याळम आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. नेटिझन्सना ती अक्षरक्षा वेड लावते. सोशल मीडियावर ती आपले फोटो शेअर करत असते. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या फलोअर्सची संख्याही अधिक आहे.
एक बिनधास्त जीवन जगणारी अभिनेत्री अशी प्रियामनीची ओळख आहे. स्वतःच्या मर्जीनुसार हवं तसं जीवन जगायला तिला आवडतं. जीवनातील कुठलीही खासगी गोष्ट असो किंवा मग एखादी भूमिका, प्रियमानीला जे आवडते ते ती करते.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
The post विद्या बालनची बहीण आहे प्रसिद्ध अभिनेत्री, बोल्ड सीन्स देण्यात तिचाही आहे हातखंडा appeared first on Home.

ड्र ग्स प्रकरणात रियाच्या घरी छापा टाकणारा अधिकारी आहे ‘या’ मराठी अभिनेत्रीचा पती

Previous article

‘टारझन द वंडर कार’ या चित्रपटाच्या ‘अभिनेत्याची पत्नी’ आहे खूपच हॉट, ‘अजय देवगण’सोबत या चित्रपटात केले आहे काम.

Next article

You may also like

Comments

Comments are closed.