Royal politicsटॉप पोस्ट

Video: पाक व्याप्त कश्मीरमधील भारतीय लष्कराच्या नेतृत्वाखालील सर्जिकल स्ट्राइक

0

पाक व्याप्त कश्मीरमध्ये शिरून सप्टेंबर 2016 मध्ये भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राइक केला होता. त्याबाबतचा व्हिडिओ काल काही न्यूज चॅनल वर प्रकाशित करण्यात आला. यात नियंत्रण रेषेच्या आसपास असलेल्या 7 दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला होता.

इंडियन एक्सप्रेस ला दिलेल्या वक्तव्यत माजी लेफ्टनंट जनरल डी. एस. हुड्डा, माजी नॉर्थ आर्मी कमांडर यांनी संगितले आहे की, हा व्हिडिओ खरा आहे, याच्या सत्यतेची मी खातरजमा केली आहे.

Loading...

या व्हिडिओमध्ये काही दहशतवाद्यांना मारताना, दहशतवादी प्रशिक्षण तळ उद्धवस्थ करताना दाखवण्यात आले आहे. मानवरहित एरियल व्हेइकल्स (यूएव्ही) आणि थर्मल इमेजिंग (टीआय) कॅमेरे याच्याद्वारे या सर्जिकल स्ट्राइकच्या व्हिडिओ घेण्यात आल्या.

Source: WION

तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, तत्कालीन सेना प्रमुख दलबीर सिंग सुहाग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी नवी दिल्लीतून या ‘सर्जिकल स्ट्राइक’चे प्रत्यक्ष निरीक्षण केले होते.

सर्जिकल स्ट्राइक झाल्यानंतर माझे मत होते की हा व्हिडिओ लवकरात लवकर सत्यतेसाठी प्रकाशित करण्यात यावा. हे चांगले झाले की त्यांनी हा व्हिडिओ आता प्रकाशित केला. असे देखील माजी लेफ्टनंट जनरल डी. एस. हुड्डा म्हणाले.

18 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या उरी हल्याला प्रती हल्ला म्हणून हा सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला. उरी हल्ल्यात 20 भारतीय जवान शहीद झाले होते.  उरी हल्ल्याला पुढील सप्टेंबरमध्ये 2 वर्ष पूर्ण होतील.

Loading...

सुजात बुखारींच्या मारेकर्‍यांची ओळख पटली, पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या सहभागाची शक्यता

Previous article

कर्नाटक सरकारला सिद्धरामय्या ठरताय डोकेदुखी? कर्नाटकातील सरकार टिकेल?

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *