Royal politicsटॉप पोस्ट

कर्नाटक सरकारला सिद्धरामय्या ठरताय डोकेदुखी? कर्नाटकातील सरकार टिकेल?

0

कर्नाटक:-

सध्या कर्नाटकमधील कुमारस्वामी यांचे आघाडी सरकार टिकेल की 5 वर्षाचा कार्यकाल तरी पूर्ण करेल की नाही अशा चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. त्याला कर्नाटकातीलच काही आजी-माजी मंत्री जबाबदार आहेत. ज्यांच्या सततच्या विधांनांमुळे कर्नाटक सरकार सत्ता स्थापनेपासून सतत चर्चचा विषय बनले आहे.

Loading...

पहिल्यांदा मुख्यमंत्री कोण, मग मंत्रिमंडळतील जागा वाटप, आणि आता नवीन अर्थसंकल्प मांडण्यास विरोध. यामुळे आता कर्नाटकातील लोकांमध्ये देखील गोंधळ निर्माण झाला आहे.

सिद्धरामय्या कॉंग्रेस आणि जेडीएस (जनता दल धर्मनिरपेक्ष) या पक्षांच्या समन्वय समितीचे अध्यक्ष असताना देखील आता त्यांच्याकडूनच सत्ता टिकवण्यसाठी समन्वय राखला जात नसल्याचे दिसून येत आहे. तेच आता कर्नाटक मधील सत्तेसाठी डोकेदुखी ठरत आहेत. त्यांच्याकडून सतत करण्यात येणार्‍या विधांनांमुळे दोन्ही पक्षातील आमदार आणि पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचे दिसते आहे.

सिद्धरामय्या यांनी नेमके काय विधान केले-

आता सिद्धरामय्या यांनी कुमारस्वामी सरकार समोर नवीनच अडचणी निर्माण केली आहे. राज्य सरकारकडून सादर करण्यात येणार्‍या अर्थसंकल्पालाच त्यांनी विरोध केला आहे. त्याच्या म्हण्यानुसार ते मुख्यमंत्री असताना फेब्रुवारीमध्ये जो अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता तोच अर्थसंकल्प पूर्ण आहे, त्यामुळे त्याला फक्त पुरवणी अर्थसंकल्प जोडण्यात यावा. त्यांच्या या भूमिकेवर कॉंग्रेस देखील नाराज आहे. आणि जेडीएसने जुनाच अर्थसंकल्प कायम ठेवण्यास पूर्णता नकार दिला आहे.

परंतू सिद्धरामय्या यांच्याकडून मांडण्यात आलेला अर्थसंकल्प मंजूर झालेला नाही, त्यामुळे हा अर्थसंकल्प मंजूरी न मिळाल्याने लागू कसा करता येईल हा प्रश्न आमदारांकडून उपस्थित केला जात आहे.

सिद्धरामय्या आजारी असल्याच्या कारणाने उपचारासाठी धर्मस्थळ येथे गेले आहेत. आणि तिथूनच ते कर्नाटक सरकारला अडचणीत आणणारी विधाने करीत आहेत. “हे सरकार 5 वर्ष पूर्ण करणार नाही, लोकसभा निवडणूक होताच काय घडेल याकडे पहावे लागेल” असे विधान केलेला सिद्धरामय्या यांचा व्हिडिओ वायरल झाला आहे. या त्यांच्या व्हिडिओमुळे कॉंग्रेस आणि जेडीएस मधील आमदार संतप्त आहेत.

“नवीन अर्थसंकल्प मांडण्यात काहीही चुकीचे नसून, पंतप्रधान असताना आपणच ही परंपरा सुरू केली होती आणि हेच आता राज्यात पाळले जाईल. ही संसदीय प्रथा आहे, नवीन सरकार नवा अर्थसंकल्प मांडत असते.” असे जेडीएसचे प्रमुख एच.डी देवेगौडा यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

Loading...

Video: पाक व्याप्त कश्मीरमधील भारतीय लष्कराच्या नेतृत्वाखालील सर्जिकल स्ट्राइक

Previous article

मुंबईत रहिवासी भागात चार्टर्ड विमान कोसळलं, 5 जणांचा मृत्यू

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *