टॉप पोस्टराजकारण

या केंद्रशासित प्रदेशाने देखील केली स्वतंत्र राज्याच्या दर्जाची मागणी

0

स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवा या मागणीसाठी दिल्लीमध्ये सध्या अरविंद केजरीवाल आणि सहकार्‍यांचे चाललेले उपोषण आणि आपचे राज्यभर आंदोलन या घटना ताज्या असताना आता पाॅंडेचेरीया केंद्रशासित राज्याचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी देखील पाॅंडेचेरीला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवा अशी मागणी केली आहे.

येथे देखील मुख्यमंत्री आणि राज्याचे नायब राज्यपाल यांच्यात श्रेयवादाच्या लढाईसाठी वाद सुरू झाला आहे. किरण बेदी या पाॅंडेचेरीच्या नायब राज्यपाल आहेत.

Loading...

दिल्ली ज्या समस्यांना तोंड देत आहे त्याच समस्यांना पाॅंडेचेरी सुद्धा तोंड देत आहे. नायब राज्यपाल किरण बेदी या सरकारच्या कामात हस्तक्षेप करीत आहेत. प्रशासनाच्या कामात सूचना ट्वीटर, फेसबूक आणि अन्य सोशल मीडिया चा वापर करीत आहे, हा प्रशासनात अस्वीकारहार्य मार्ग आहे.” असे  पाॅंडेचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी म्हणाले. सरकारच्या कामात हस्तक्षेप हे संविधान आणि लोकप्रतिनिधी यांच्या अधिकारांमधील अडथळे आहेत. असे देखील ते म्हणाले.

यावरुन सुरू झाला वाद- 

नायब राज्यपालांनी व्हाट्स अॅप  किंवा सोशल मीडियाच्या सूचनांचे पालन करू नये असा आदेश पाॅंडेचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी आपल्या मंत्रिमंडळला दिल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. या नंतर मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी आणि नायब राज्यपाल किरण बेदी यांच्यात सतत शाब्दिक चकमकी आणि वाद होऊ लागले.

तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्व खालील केंद्रातील भाजप सरकार या परिस्थितीला जबाबदार असल्याचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी आरोप केला आहे. मोदी सरकार भाजप नसलेल्या  राज्यात असे प्रकार करीत असल्याचे देखील ते म्हणाले.

नायब राज्यपाल किरण बेदी या राज्य सरकारच्या प्रकल्पांना परवानगी देण्यास देखील विलंब करीत आहे, जेणेकरून सत्तेतील सरकारला आडथळे निर्माण होतील.

प्रशासनातील बदल हे केंद्रशासित प्रदेशात सकारात्मक बदल करण्यासाठी असल्याचे किरण बेदी यांनी संगितले आहे.

Loading...

34 वर्षांनी आॅस्ट्रोलियाच्या संघाबरोबर घडली ही गोष्ट

Previous article

FIFA WC 2018 : 12 वर्षांनी केलेल्या गोलने स्वीडनने केली साउथ कोरियावर मात

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *