Royal politicsटॉप पोस्ट

कोण होता मुन्ना बजरंगी? ज्याची उत्तर प्रदेशमधील जेलमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली

0

उत्तर प्रदेशचा कुख्यात गॅंगस्टर प्रेम प्रकाश सिंह उर्फ मुन्ना बजरंगी याची आज सकाळी उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील जेलमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सोमवारी मुन्ना बजरंगीला बागपतच्या कोर्टोत उपस्थित करण्यात येणार होते.

2005 साली भाजपा नेत्याची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर होता. या घटनेनंतर जेलर,जेलर डेप्युटी आणि अन्य दोन जणांना निलंबित करण्यात आले आहे. या हत्ये मागे सुनील राठीचा हात असल्याचे सांगितले जात आहे.

Loading...

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जेलमध्ये झालेल्या या हत्येला गंभीर घटना असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, या घटनेची योग्य पध्दतीने चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे आणि दोषींच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल.

काही दिवसापुर्वीच मुन्ना बजरंगीच्या पत्नी सिमा सिंहने त्यांच्या जिवाला धोका असल्याचे सांगितले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे सुरक्षा वाढविण्याची देखील मागणी केली होती. तसेच सिमा सिंहचे म्हणणे होते की, फेक इनकाऊंटरमध्ये त्यांची हत्या करण्यात येऊ शकते.

कोण होता मुन्ना बजरंगी ?

प्रेम प्रकाश सिंह उर्फ मुन्ना बजरंगीचा जन्म 1967 ला उत्तर प्रदेशच्या जोनपूर जिल्ह्यात झाला. पाचवी नंतर त्याने शाळा सोडून दिला. अल्पवयीन असताना अवैध शस्त्र आणि मारहानीच्या गुन्ह्यात पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. त्यानंतर 80 च्या दशकात स्थानिक गुंड गजराज सिंहचे संरक्षण त्याला मिळाले.

1984 मध्ये मुन्ना बजरंगीने पहिली हत्या केली. त्यानंतर गजराज सिंहच्या सांगण्यावरून जौनपूरचे भाजपनेते रामचंद्र सिंहची हत्या केली. त्यानंतर 2005 साली त्याने आपल्या काही लोकांबरोबर भाजप आमदार कृष्णानंद राय सोबत अन्य सहा जणांची दिवसा गोळ्या घालून हत्या केली.

1998 मध्ये दिल्लीमध्ये झालेल्या इनकाऊंटरमध्ये 9 वेळा गोळ्या लागून देखील तो वाचला होता.  मुन्ना बजंरगीवर 7 लाखांचे बक्षीस होते. उत्तर प्रदेश बरोबर एसटीएफ आणि सीबीआई देखील त्याच्या मागावर होते.

आॅक्टोंबर 2009 मध्ये मुंबईच्या मलाड भागात त्याला अटक करण्यात आली.

2012 मध्ये बजरंगीने अपना दल या पक्षाच्या तिकिटावर उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवली होती. त्याच्यावर 40 पेक्षा अधिक हत्या आणि खंडणीचे गुन्हे जमा होते.

Loading...

खड्ड्यात गेलेल्या मुंबई-गोवा एक्सप्रेस हायवेचे हे आहे सत्य, जाणून घ्या

Previous article

Nirbhaya Case:- ‘त्या’ क्रूर दोषींची फाशी कायम, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *