Royal politicsटॉप पोस्ट

तब्बल 350 वृत्तपत्रांनी एकाच वेळी या ‘पावरफुल’ राष्ट्रपतीच्या विरोधात उठवला आवाज

0

अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या विरोधात तेथील न्यूज मिडिया पेटून उठला आहे. कारण 1 – 2 नाही तर तब्बल 350 वृत्तपत्र आणि मिडिया संस्थांनी पत्रकारांवर सतत हल्ले करणे आणि अमेरिकेतील लोकांपुढे ‘मिडिया लोकांचा शत्रू आहे’ असे चित्र निर्माण करण्याच्या कारणावरून डोनाल्ड ट्रंप यांच्या विरुद्ध संपादकीय छापले आहे.

ट्रंप यांनी मिडियाच्या विरोधात लोकांमध्ये द्वेष निर्माण करण्यात सुरुवात केली आहे, मिडियावर या आधीपासूनच ते खार खाऊन आहेत. आता तर तो विरोध त्यांनी चांगलाच प्रखर केला आहे. ट्रंप यांना अयोग्य प्रश्न विचारला या कारणाने व्हाईटहाऊसने मागील महिन्यात ‘सीएनएन’ या अमेरिकेतील प्रसिद्ध न्यूज चॅनलच्या पत्रकाराला सरकारच्या सार्वजनिक कार्यक्रमात येऊन रिपोर्टिंग करण्यावर बंधन घातले आहे.

Loading...

ट्रंप यांनी तेथील मिडियाने यांच्या राजकीय धोरणांबद्दल केलेल्या रिपोर्टिंगला अनेक वेळा खोटे ठरवून त्यांची बदनामी केली आणि लोकांना पत्रकार हे शत्रू असल्याचे संगितले.

याच कारणाने अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठित वृत्तपत्र ‘बोस्टन ग्लोब’ने #’एनीमी ऑफ नन’ हॉशटॅग ट्विटरवर वापरल्याने  राष्ट्रपती ट्रंप मिडियाच्या विरोधात करत असलेल्या ‘डर्टी वॉर’ बद्दल संपूर्ण देशात निंदा करण्यात आली.

journalists are not the enemy

journalists are not the enemy

ट्रंप यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंट वर फेक न्यूज या शब्दाचा वापर तब्बल 300 वेळा केला असावा असे त्यांचे ट्वीटर हॅंडल पहिले की वाटते.

ट्रंप यांच्याकडून मिडियावर होणार्‍या हल्ल्याला आणि प्रत्येक राजकीय धोरणांवर करण्यात येणार्‍या रिपोर्टिंगला ‘फेक न्यूज’ सांगणे आणि वृत्तपत्र/ पत्रकारांना समाजाचे शत्रू सांगणे यामुळे बोस्टन ग्लोब या वृत्तपत्राने देशातील सगळ्या वृत्तपत्र संस्थांना भेटीचे आमंत्रण देऊन प्रेसच्या स्वातंत्र्यासाठी उभे राहण्यास संगितले. यावेळी 350 मिडिया संस्था उपस्थित होत्या आणि सगळ्यांनी मिळून गुरुवारी वृत्तपत्राच्या संपादकीय पानावर प्रेसच्या स्वातंत्र्यासाठी संपादकीय छापण्याचे ठरवले.

journalists are not the enemy

journalists are not the enemy

 

journalists are not the enemy

journalists are not the enemy

‘बोस्टन ग्लोब’ने आपल्या संपादकीय पानावर छापले की, ‘स्वतंत्र मिडियाच्या जागी सरकारी मिडिया आणणे भ्रष्ट प्रशासनाची सदैव पहिली प्राथमिकता राहिली आहे.’  द फयेट्टविले एन सी अॉब्जर्वर या वृत्तपत्राने त्यांच्या संपादकीय मध्ये असे लिहिले आहे की, ‘ट्रंप याच्या समर्थक हे मान्य  करतील की, ते  (ट्रंप) जे करत आहेत त्याला वास्तवात आपल्या मर्जीने मोड-तोड करणे असे म्हणतात.’

‘स्टिंगिंग’च्या संपादकीयमध्ये असे लिहिले आहे की, आज अमेरिकेत एक असा राष्ट्रपती आहे; त्याने या मंत्राचा निर्माण केला आहे की, मिडियाचे असे सदस्य जे भविष्यातील अमेरिकेच्या प्रशासनिक धोरणांना विरोध करतील ते अमेरिकी लोकांचे शत्रू असतील. 

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात डोनाल्ड ट्रंप यांच्या परमाणु धोरणावर दाखवण्यात आलेल्या बातम्यांवरून धमकी दिली होती की, अमेरिकेतील सगळ्या मोठ्या न्यूज चॅनलचे प्रसारण रद्द करून टाकू.

हे ही वाचा- 

Rafale Controversy : राफेल विमानप्रकरणी सोशल मिडियावर व्हिडिओ वॉर, भाजप, कॉंग्रेसनंतर आता ‘आप’ने देखील केला व्हिडिअो शेअर

संपूर्ण करिअरमध्ये सर्वच शतके भारताविरूध्द मारणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूवर 10 वर्षांची बंदी

 

Loading...

PHOTOS : माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन

Previous article

क्रिकेटर ते पंतप्रधान – जाणून घ्या पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांचा संपूर्ण प्रवास

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *