Royal politicsमुख्य बातम्या

आजपासून अलाहाबादची ओळख ‘प्रगायराज’; योगीसरकारचा निर्णय

0

अलाहाबाद शहर आता अलाहाबाद नाही तर प्रयागराज या नावाने ओळखले जाईल. 444 वर्षापूर्वी अकबर बादशाहाने या शहराचे पूर्वीचे प्रयागराज बदलून अलाहाबाद केले होते. परंतु आता पुन्हा एकदा या शहराचे नाव तेथील योगी आदित्यनाथ सरकारकडून बदलण्यात आली आहे. अलाहाबाद शहराचे नाव बदलण्याच्या निर्णयाला आदित्यनाथ योगी यांच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली आहे.

नावात काय आहे?

Loading...

इतिहासकालीन पुस्तके आणि अकबरनामा या ग्रंथात लिहल्याप्रमाणे इतिहास तज्ञांच्या मते, अकबर बादशाहाने सन 1574 च्या आसपास प्रयागराज (अलाहाबाद) येथे किल्ल्याची पायाभरणी केल्याचे म्हटले आहे. अकबरने या ठिकाणी नवीन नगर वसवले आणि त्याचे नाव इलाहाबास करण्यात आले. त्यानंतर ते अलाहाबाद असे प्रचलित झाले. त्याआधी हे शहराला प्रयागराज या नावानेच ओळखले जात होते.

या आधी ऑगस्ट महिन्यात आदित्यनाथ योगी सरकारकडून प्रसिद्ध मुगलसराय या वाराणसी येथील रेल्वे स्टेशनचे नाव बदलून पंडित दिनदयाल उपाध्यय (DDU) असे करण्यात आले होते.

याआधी योगी आदित्यनाथ सरकारकडून बदलण्यात आलेली नावे – 

अलीनगर – आर्य नगर

मिया बाजार – माया बाजार

इस्लामपूर – ईश्वरपूर

हुमायूँ नगर – हनुमान नगर

उर्दू बाजार – हिंदी बाजार

लाहलादपूर – आल्हादपूर

तसेच सिविल टर्मिनल ऑफ इंडियन एअर फोर्स गोरखपूर याचे नाव बदलून महायोगी गोरखनाथ करण्यात आले. गोरखनाथ हे नाथ पंथाचे संस्थापक आहेत.

हजरथ चौहरया या प्रसिद्ध रस्त्याचे नाव बदलून भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी करण्यात आले.

ऑगस्ट 2018 ला आदित्यनाथ सरकारने केंद्र सरकारकडे बरेली एअरपोर्टचे नाव बदलून नंतर नाथनागरी करण्यात यावे अशी मागणी केली होती.

उत्तरप्रदेशात सरकारकडून सतत बदलण्यात येणार्‍या नावांमुळे विरोधी पक्षांकडून आदित्यनाथ सरकारचा विरोध करण्यात येत आहे.


हे ही वाचा – 

नवरात्री स्पेशल : लहान गरीब मुलांसाठी ‘ती’ करते सढळ हाताने मदत, केला नोकरीचा त्याग!

गोव्यात नव्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत विश्वजित राणे; कॉंग्रेसच्या या दोन आमदारांची भाजप प्रवेशाची शक्यता

Pro Kabaddi :- हरियाणा स्टिलर्स विरुद्ध जयपूर पिंक पॅंथर; दोन्ही मातब्बर संघांची प्रतिष्ठा पणाला


 

Loading...

भवानी मातेला उदयनराजे भोसले यांनी घातलं ‘हे’ साकडं

Previous article

कॉंग्रेसच्या दोन आमदारांचा राजीनामा,सायंकाळी होणार भाजपाप्रवेश

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *