राजकारण

‘देशातील अघोषित आणीबाणी; आणीबाणी पेक्षा अधिक भयंकर’; राजस्थानमध्ये राजकीय गोंधळ

0

राजस्थान:-

राजस्थानात आपल्या वादग्रस्त विधानाने सतत चर्चेत असलेल्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या सरकारला एक मोठा धक्का बसला आहे. राज्यातील विधानसभा निवडणूका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना राजस्थानात भाजपचा एक मोठा चेहरा मानल्या जाणाऱ्या घनश्याम तिवारी यांनी 25 जूनला भाजपचा राजीनामा दिला आहे. राजस्थान सरकारसाठी हा जबरदस्त धक्का मनाला जात आहे.

Loading...

अचानक घेतलेल्या राजीनाम्यामुळे नवा वादंग-

आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, भ्रष्टाचार या सारखे मुद्दे देशभरात गाजत असताना राजस्थानात देखील याच मुद्याने उचल खाल्ली आहे. आणि याच मुद्यांवर मतभेद झाल्याने भाजप नेते घनश्याम तिवारी यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

सामान्य लोकांचे आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, भ्रष्टाचार हे मुद्दे आता राज्यातील विधानसभा निवडणूकाजवळ आल्यावरच कसे काय आठवले? जर सरकारची धोरणे चुकीची होती तर तर या आधीच विरोध करून का राजीनामा दिला नाही? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

राजीनामा दिल्यावर घनश्याम तिवारी यांनी नवा पक्ष काढण्याचा इशारा दिला आहे. त्यांचे पुत्र अखिलेश यांच्या साहाय्याने भारत वहिनी पार्टी नावाचा पक्ष काढून विधानसभेच्या 200 जागा लढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

राजीनामा दिल्यानंतर ते असे देखील म्हणले आहेत की, “अघोषित आणीबाणी; आणीबाणी पेक्षा अधिक भयंकर असते. मी या दोन्ही परिस्थिती पहिल्या आहेत.” आज आणीबाणी दिवसानिम्मित पंतप्रधान मोदी यांनी  मुंबईमध्ये केलेल्या भाषणानंतर हे विधान देशाची परिस्थिती सांगण्यासाठी उल्लेखनीय आहे.

कोण आहे घनशाम तिवारी-

घनश्याम तिवारी हे राजस्थानातील भाजपचे जुने आणि प्रतिष्ठित नेते आहेत. 2003 पासून राजस्थानातील सांगानेर या विधानसभा मतदार संघाचे आमदार होते. बऱ्याच वर्षांपासून वसुंधराराजे आणि घनश्याम तिवारी यांच्यात मतभेद आहेत.

त्यांच्याकडून सामान्य जातीतील लोकांसाठी आरक्षणाची मागणी कायमच करण्यात येते. राजस्थानातील लोकसंख्येच्या 67-68 टक्के लोकसंख्या सामान्य वर्गाची आहे. त्यामुळे त्यांच्या हिताचे समर्थन करणाऱ्या घनश्याम तिवारी यांना नेहमीच समर्थन मिळते. राजस्थानातून आरक्षणाची अशी मागणी कायमच करण्यात येते.

तरीही आगामी विधानसभा निवडणुकीत या सर्व घटकांचा राजस्थानच्या राजकीय सत्तांतरावर काय परिणाम होईल हे पाहण्यासारखे असेल.

देशातील अघोषित आणीबाणी; आणीबाणी पेक्षा अधिक भयंकर असल्याचे पत्र घनश्याम तिवारी यांनी अमित शाह यांना पाठवले आहे. याबाबतचे ट्विट देखील त्यांनी केले.

(PHOTO INPUT:- FACBOOK/GHANASHYAM TIWARI)

Loading...

तब्बल 15 वर्षांनंतर सरकारने हाती घेतले व्यसनमुक्ती धोरण

Previous article

मी भाजपचा राजीनामा का देत आहे

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *