मुख्य बातम्या

उमेश भोसले यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी

0

सोलापूर 18 फेब्रुवारी (हिं.स) करमाळा तालुक्यातील चिखलठाण नंबर एक येथील उमेश भोसले या मासे विक्रेत्याला गावातील गावगुंडांनी मारहाण केली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला असून, करमाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊनसुद्धा आरोपींना अद्याप अटक झाली नाही. या आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी अखिल भटका जोशी समाज सेवा संघाचे प्रांतिक कार्याध्यक्ष आप्पासाहेब सोनवणे यांनी करमाळा पोलीस स्टेशन व करमाळा तहसिलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सदर घटनेतील आरोपींना अटक न केल्यास महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. उमेश यांचा मासे विक्रीचा व्यवसाय आहे. ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी गावातील दोघेजण रात्री दहा वाजता उमेश यांच्या घरी मासे आहेत का अशी विचारणा करायला गेले असता भोसले यांनी मासे नाहीत असे सांगितले.

Loading...

तेव्हा त्या दोघांनी भोसले यांना बेदम मारहाण केली. त्यांना दवाखान्यात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, दोन दिवसात आरोपींना अटक न केल्यास अखिल भटका जोशी समाज संपूर्ण राज्यभर मोर्चे काढून रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.

Loading...

ग्रामीण पोलीस ठाण्यांमधून नातेपुते पोलीस ठाणे अव्वल

Previous article

चंदन चोरटा अटकेत

Next article

You may also like

Comments

Comments are closed.