Royal politicsटॉप पोस्ट

तुमच्या मोबाइल मध्ये झालाय का आधारचा टोल-फ्री नंबर सेव्ह? हा नंबर आहे खोटा; जाणून घ्या सत्य

0

कालपासून एक मेसेज सतत व्हायरल होत आहे की आधार क्रमांकसाठी असलेला टोल फ्री नंबर अनेक लोकांच्या मोबाइल हँडसेटमध्ये आपोआप सेव होत आहे. यावर काल सोशल मीडियावर बरीच टिवटिव झाली. कारण प्रत्येकाच्या प्रयवेसीचा प्रश्न होता आणि असा विषय असला की लोक त्यावर तुटून पडतात. सत्यतेची पडताळणी न करताच मेसेज फॉरवर्ड करतात. शेवटी युनिक आयडेटीफीकेशन अथोंरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ला यावर ट्विट करीत स्पष्टीकरण द्यावे लागले.

काल अनेक लोक तेव्हा चिडून उठले जेव्हा त्याच्या मोबाइलमध्ये यूआयडीएआयचा टोल- फ्री  1800-300-1947 हा नंबर त्यांच्या कॉनटॅक्ट लिस्टमध्ये आपोआप सेव झाला. त्यानंतर यूआयडीएआयने ट्विट करीत स्पष्टीकरण दिले की, आम्ही कोणत्याही सर्विस प्रोवायडरला ही अशी सेवा देण्याबद्दल काही संगितले नाही किंवा कोणताही आदेश दिला नाही.

Loading...

यूआयडीएआय च्या ट्विटर अकाऊंटवरून काल ट्विट करीत झालेल्या प्रकारावर सतत स्पष्टीकरण देण्यात आले की, कोणत्याही सर्विस प्रोवायडर, मोबाइल मैन्युफैक्चरर्स किंवा अण्ड्रइड प्रोवायडर यांना कोणत्याही मोबाइल हँडसेटमध्ये यूआयडीएआय चा 1800-300-1947 किंवा 1947 हा नंबर अॅड करण्यासाठी सांगण्यात आले नाही.

ज्या सेव झालेल्या टोल-फ्री नंबर बद्दल आता एवढी चर्चा चालू आहे तो नंबर कधीच बंद करण्यात आला आहे. म्हणजे तो नंबर सेवेतच नाही. त्याजागी यूआयडीएआयने नवीन टोल-फ्री नंबर सुरू केला आहे. आमचा यूआयडीएआयचा नवा टोल-फ्री नंबर 1947 हा आहे आणि तो मागील काही वर्षापासून सेवेत आहे. काही लोक कारण नसताना लोकांच्या मनात शंका निर्माण करीत आहेत असे ट्विट यूआयडीएआयकडून करण्यात आले. 

फ्रांसच्या एका विशेषतज्ञाने इलियट एल्डरसन जो इथिकल हॅकर आहे यांनी यूआयडीएआय सवाल केला आहे की, अनेक लोकांचे सर्विस प्रोवायडर वेगवेगळे आहेत. अनेकांकडे आधार कार्ड देखील नाही, खूप लोकांच्या मोबाइलमध्ये एम आधार अॅप इंस्टॉल नाही असे असताना देखील अनेक मोबाइल कॉनटॅक्टमध्ये यूआयडीएआय  टोल-फ्री नंबर सेव असल्याचे दिसते आहे. तुम्ही सांगू शकतात की हे असे का ?

या आधी अनेक लोकांना असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला की, कोणत्याही परवानगी शिवाय यूआयडीएआयचा टोल-फ्री नंबर कोणाच्याही कॉनटॅक्ट लिस्टमध्ये असा आपोआप कसा सेव होऊ शकतो ? असे असले तरीही आधारचा टोल- फ्री नंबर सगळ्याच मोबाइल फोनमध्ये सेव झालेले नाहीत.

मागील आठवड्यात देखील आधार च्या सुरक्षिततेचा प्रश्न अशाच प्रकारे ऐरणीवर आला होता. ट्रायचे चेअरमन आर एस शर्मा यांनी आपला आधार नंबर सोशल मीडिया वर टाकून तो हॅक करून त्यांना धोका पोहोचवण्याचे चॅलेंज दिले होते. हे चॅलेंज अनेक हॅकर्सने स्वीकारून त्यांची अनेक वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर टाकली होती, आणि एवढेच नाही तर त्याच्या बँक अकाऊंटवर 1-1 रुपया टाकून ऑनलाइन व्यवहार करून त्याचे बँक अकाऊंट किती सुरक्षित आहे हे दाखवले होते.

हे ही वाचा-

आधारकार्ड नंबर देऊन हॅक करण्याचे दिले होते आवाहन; हॅकर्सने केले 1-1 रुपये बँक खात्यात जमा

Mulk Movie Review In Marathi : हिंदू की मुस्लिम ? ते की आम्ही ? तापसी पन्नू आणि ऋष‍ि कपूर स्टारर ‘मुल्क’ सांगतोय हा देश कोणाचा?

Loading...

बाहुबली पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पण थेटरमध्ये नाही तर येथे; जाणून घ्या

Previous article

तीन न्यायाधीशांच्या नियुक्ती बरोबरच सुप्रीम कोर्टाने एक नवीन रेकाॅर्ड आपल्या नावावर केला

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *