Royal politicsटॉप पोस्ट

देशात स्त्रिया सुरक्षित नाहीत आणि सरकार गाई वाचवायला निघालय- उद्धव ठाकरे

0

सध्या देशात निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली, त्यात त्यांनी भाजप आणि मोदी सरकारवर जबर टीकास्त्र सोडले. भाजप आणि शिवसेनेतील वाढत्या तणावामध्ये देण्यात आलेली ही मुलाखत अत्यंत महत्वाची ठरते.

शिवसेनेनंतर आता अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याचे आदेश दिले आहेत. आणि या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी दिलेली मुलाखत.

Loading...

या मुलाखतील त्यांनी मोदींवर टीका करण्याचे काही सोडले नाही. सत्तेत राहून सरकारवर टीका करणं हे आमचा काम आहे. विरोधी पक्ष काय करतोय हे आपण सगळे आणि सामान्य लोक पाहत आहे. आम्ही कधी लपून काही केली नाही, जे केले ते खुलेआम केले. साथ दिली तर ती ही खुलेआम दिली आणि विरोध केला तर खुलेआम केला. आम्ही सरकारच्या कोणत्याही धोरणाचा जर विरोध केला असेल तर तो देशाच्या आणि लोकांच्या हितासाठी केला. 

“शिकार तर आम्हीच करणार परंतू त्यासाठी कोणाच्या बंदुकीचा वापर करणार नाही… ” असे म्हणत सत्तेत असलेल्या मोदी सरकारला इशारा दिला. 

अविश्वास प्रस्तावावर काय बोलले उद्धव ठाकरे- 

जर सरकारच्या बाजूने मत द्यायचे असते तर त्यांच्या निर्णयावर आम्ही प्रश्न का उपस्थित केले असते.

मागील चार वर्षांपासून शिवसेना अनेक निर्णयांवर आपला दृष्टीकोण मांडत आला आहे. ते आता कुठे इतर पक्षांच्या लक्षात यायला लागल आहे. आता जे कोणी लोक एकत्र येऊन बोलत आहे. ते मत शिवसेनेने या आधीच मांडल आहे. मग ते मत नोटाबंदी बाबतच असू दे किंवा जीएसटी बाबतच. शिवसेनेने कायमच सडेतोड आपला म्हणणं मांडला आहे.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे असे म्हणाले की, वेळो वेळी सरकारच्या विरोधात बोलण्याचे साहस फक्त शिवसेनेत आहे. देशात स्त्रिया सुरक्षित नाहीत आणि  सरकार गायांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. 

लोकसभेत मांडण्यात आलेल्या मोदी सरकार विरोधातील अविश्वास प्रस्तावावेळी शिवसेनेने लोकसभेत येण्यास आणि मतदान करण्यास नकार दिला होता. परंतू लोकसभेत येऊन महाराष्ट्राबाबतचे प्रश्न शिवसेनेने  मांडने अत्यंत गरजेचे होते. उदाहरणार्थ- महाराष्ट्रातील शेतकर्‍यांबाबतचा प्रश्न ( हमीभाव, दुधाचे दर, पाणी प्रश्न ). आणि या कारणाने शिवसेनेला लोकांच्या हितासाठी सरकार विरोधात अविश्वास प्रस्तावात मतदान करण्याची देखील संधी होती.

काल उद्धव ठाकरे यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्राला मुलाखत दिली. ही मुलाखत संजय राऊत यांच्याकडून घेण्यात आले.

Loading...

आता लंडनच्या मादाम तुसाँ संग्रहालयात उभारणार या प्रसिध्द भारतीय अभिनेत्रीचा पुतळा

Previous article

लई भारी नंतर रितेश देशमुख चा हा नवा मराठी चित्रपट होतोय रिलीज, पहा फर्स्ट लुक

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *