मुख्य बातम्या

उद्धव साहेब आतातरी घराबाहेर पडा, नगरसेवक गाड्या फोडतात आता नागरिक देखील फोडतील…

0

राज्यावर दिवसागणिक कोरोनाचे संकट वाढतच चालले आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १६,४२९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर उपचार सुरु असलेल्या ४२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९,२३,६४१ इतका झाला आहे. यापैकी २,३६,९३४ रुग्णांवर अजूनही उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत राज्यातील २७०२७ जणांनी आपले प्राण गमावले आहेत.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी राज्य प्रशासन विविध उपाययोजनांची  अंमलबजावणी करताना दिसत आहे. मात्र कोरोनाचे प्रमाण दिवसागणिक वाढतच चालले आहे.
काल दिवसभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात मिळाले. गेल्या २४ तासांत याठिकाणी २०५३ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १,०७, ९५८ झाला आहे. यापैकी पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी १,२६९ करोनाबाधित रुग्ण आढळून आले.
पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबद्दल मनसेचे सरचिटणीस वसंत मोरे यांनी मुख्यमंत्र्यांवर आणि त्यांच्या कामकाजावर हल्ला केला आहे. वसंत मोरे म्हणतात की ‘राज्याला कोरोनाचा विळखा अधिक वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पडण्याची तसदी घेत नाहीयेत.अजूनही ते आत बसूनच हे सरकार चालवत आहेत.’
राज्यातील जनतेला या कोरोनाने,लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाने,पावसाने  अशा एक ना अनेक संकटांनी चहू बाजूने वेढले आहे. मात्र या महाविकास आघाडीचे सरकार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील गरीब, गरजू जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. त्यानं याची पर्वाच नाही असे दिसतय.
राज्यातील जनता या सर्व त्रासाला कंटाळली आहे. त्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. मात्र आता या महासंकटाच्या काळात त्यांची लुबाडणूकच सुरू आहे. त्यामुळे आता जनतेचा रोष बाहेर यायला वेळ लागणार नाही.
सरकारी कर्मचारी आणि पोलीस सध्या या न त्या कारणांसाठी नागरिकांना वेठीस धरत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत.हि महाविकास आघाडीची लोकं आणि त्यांचे हे मुख्यमंत्री ‘माझी जनता माझी लोक म्हणतात , नेमके ते लोक महाराष्ट्रचेच आहेत की पाकिस्तानचे ?’ असा मला प्रश्न पडतो.
सध्याच्या या काळामध्ये जनतेला आधाराची,मदतीची गरज आहे. मात्र अशावेळी सत्तेतले काही बडे नेते सोडले तर कोणीही लोकांना येऊन भेटून त्यांची चौकशी करत नाहीयेत. मुख्यमंत्र्यांनी तर जनतेला वाऱ्यावर सोडलयं त्यांनी तर जनतेत मिसळून तत्यांची चौकशी करण कधीचं सोडून दिलंय असं म्हणायल काहीच हरकत नाही. ‘मी आलो तर गर्दी होते’ अशी कारणे देऊन नुसतं व्हिडीओ कॉन्फरन्सने आत्ताचे अनुभव नसलेले मुख्यमंत्री गप्पा मारतात. प्रत्यक्षात काम मात्र काहीच नाही !
कोरोनाच्या या महासंकटातही मराठी अस्मिता,मुंबई अशा नको त्या विषयांवरून तुमचे आमदार,खासदार घाणेरडे राजकारण करतात दिसत आहेत. खरचं याची आत्ता गरज आहे का? याचा जरा विचार करा.
सध्या राज्यातील,महाराष्ट्रातील या लोकांना गरज आहे ती आर्थिक पाठबळीची. लॉकडाऊन मुळे अनेक गोर गरीब,हातावर पोट असणाऱ्या गरजू लोकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली आहे. कोरोनावर उपचारासाठी लागणारा भरमसाठ पैसा कुठून आणायचा ? असा प्रश्न सध्या या गरीब जनतेसमोर आहे. मुलांच्या शिक्षणाचं पुढे काय ? लॉकडाऊनमुळे गमावलेल्या नोकरीचे काय? घरभाडे,बँकेचे हप्ते कसे फेडणार? असे एक न हजार प्रश्न सध्या लोकांना भेडसावत आहे त्यामुळे निदान आता तरी मुख्यमंत्री साहेब या जनतेचा अंत पाहू नका. आणि आता तरी उद्धव साहेब घराबाहेर पडा !!

महत्वाच्या बातम्या :-
वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे ‘या’ जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून पुन्हा लॉकडाऊनची मागणी
कोरोना चाचणीचे दर आणखी कमी करणार ; आरोग्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा
मोदींनी इतक्या वर्षात 1800 रुपयांची नोट का काढली नाही? व्हायरल काकूनंतर काकांची मागणी
शिरुरमधील धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश
इतक्या पारदर्शक बदल्या यापूर्वी कधीच झाल्या नाहीत ; शिवसेनेचा भाजपला टोला
 
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. उद्धव साहेब आतातरी घराबाहेर पडा, नगरसेवक गाड्या फोडतात आता नागरिक देखील फोडतील… InShorts Marathi.

MPSCने जाहीर केली नवीन गुणपद्धती ; केला ‘हा’ मोठा बदल

Previous article

“तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते, राज्यातील पोलीस भांडी घासायच्या लायकीचे आहेत ! “

Next article

You may also like

Comments

Comments are closed.