Royal politicsमहाराष्ट्रमुख्य बातम्याशेती

भवानी मातेला उदयनराजे भोसले यांनी घातलं ‘हे’ साकडं

0

उदयनराजे भोसले यांनी प्रतापगडावर जाऊन भवानी मातेचं दर्शन घेतलं. नवरात्रोत्सवानिमित्त भोसले यांच्या हस्ते प्रतापगडावर भवानीमातेची पूजा करण्यात आली.दुष्काळापासून लोकांचं रक्षण करण्यासाठी आपण भवानीमातेला साकडं घातल्याचं उदयनराजे यांनी सांगितलं.

दरवर्षी नवरात्रोत्सवात प्रतापगडावर उदयनराजे सहकुटुंब भवानीमातेची पूजा करतात. दरम्यान, उदयनराजेंच्या हस्ते भवानी मातेची आरती घेण्यात आली. यावेळी शिवभक्तांनी गडावर मोठी गर्दी केली होती. सकाळी उदयनराजे भोसले हे गडावर आले तेव्हा त्यांचं स्वागत तुतारीच्या निनादात करण्यात आले.

Loading...

उदयनराजेंच्या हस्ते पूजा झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना भवानीमातेचं महत्व सांगितलं. दुष्काळापासून लोकांचं रक्षण करण्यासाठी आपण भवानीमातेला साकडं घातल्याचं उदयनराजे यांनी सांगितलं. यावेळी उदयनराजेंनी लोकांना दुष्काळापासून वाचायचं असेल तर झाडे लावण्याचाही सल्ला दिला. उदयनराजेंनी हात जोडून विनंती करत, झाडे तोडू नका झाडे जगवा असं आवाहन केलं.

Loading...

सलमान ‘भाई’ आणि ‘राणी’ दीपिकाचीच बॉलीवुडवर सत्ता !

Previous article

आजपासून अलाहाबादची ओळख ‘प्रगायराज’; योगीसरकारचा निर्णय

Next article

You may also like

Comments

Comments are closed.