Royal politicsटॉप पोस्टट्रेंडिंगमुख्य बातम्या

उदयनराजे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक; राजेंनी पवारांसोबत केला ‘रोझ डे’ साजरा

0

जागतिक रोझ डे दिवशी साताऱ्याचे खासदार श्री. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांना गुलाबाचा बुके दिला. दोघांमध्ये झालेल्या हास्य मैफिलीमुळे उदयनराजेंच्या बहुचर्चीत उमेदवारीचे फटाके फुटले आहेत.

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी उदयनराजेसमावेत आगामी निवडणुकीच्या रणनीती बाबत गांभीर्याने चर्चा केली. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत उदयनराजे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक राहणार असल्याचे बोलले जाते.

Loading...

दरम्यान मधल्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उदयनराजेंशी जवळीक ठेऊन होते. राजें भाजपच्या तिकिटावर निवडणूक लडवणार असेही तर्क वितर्क लावले जात होते. परंतु शरद पवारांच्या भेटी नंतर  तर्क वितर्काना पूर्णविराम लागला आहे. या सर्व गोष्टीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा निराशा होते का ? हे येत्या निवडणुकीत स्पष्ट होईल.

कृषी विषयक बातम्या वाचण्यासाठी कृषीनामा या वेबसाईटला भेट द्या

कृषी विषयक बातम्या वाचण्यासाठी कृषीनामा या वेबसाईटला भेट द्या

कृषी विषयक बातम्या वाचण्यासाठी कृषीनामा या वेबसाईटला भेट द्या

Loading...

शेतकऱ्यांच्या मुलींचा भाऊ म्हणून मी कायम सोबत असेल- रोहित पवार

Previous article

या बाबतीत बारामतीने मोदींच्या मतदारसंघालाही मागे टाकलं

Next article

You may also like

Comments

Comments are closed.