मुख्य बातम्या

तिच्या जाण्यानं उदयनराजे झाले हळवे , शेअर केली भावनिक पोस्ट

0

खासदार उदयनराजे भोसले यांनी एका भावनिक पोस्टच्या माध्यमातून एका खास व्यक्तीच्या निधनाचं दु:ख व्यक्त केलं आहे. तिचं जाणं हे फक्त सातारकरांसाठी नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठीच अत्यंत वाईट बातमी आहे अशा शब्दांत त्यांनी या पोस्टची सुरुवात केली.
“प्लमोनरी हायपरटेन्शन” या आजाराचं निदान झाल्यानंतर त्याच्या झुंज देणाऱ्या कोमल पवार गोडसे हिचा संघर्ष त्यांनी आपल्या या पोस्टच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. कोमल ही महाराष्ट्रातील दोन्ही फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण झालेली पहिली व्यक्ती. पण, काही दिवसांपूर्वीच तिचा आजार बळावला आणि गोष्टींनी नको तेच वळण घेतलं.

सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी.सातारा शहराला अभिमान असलेला हसरा चेहरा कोमल पवार -…
Chhatrapati Udayanraje Bhonsle ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 1, 2020

 
कोमल ही आपल्या लहान बहिणीप्रमाणे असल्याचं म्हणत उदयनराजे यांनी तिच्यासोबतचा एक फोटोही पोस्ट केला. या फोटोसह त्यांनी लिहिलं, ‘सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी, अत्यंत वाईट बातमी. सातारा शहराला अभिमान असलेला हसरा चेहरा कोमल पवार – गोडसे हीला २०१७ साली “प्लमोनरी हायपरटेन्शन” या व्याधीचे निदान झाले आणि तिचे आयुष्य जणू तिथेच स्तब्ध झाले, पण तिने व तिच्या पतीने धीर सोडला नाही आणि ती मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली आणि कोमल ठरली होती महाराष्ट्रातील पहिली “दोन्ही फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण” झालेली व्यक्ती. पण ३ दिवसापूर्वी कोमलचा आजार अचानक वाढल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार यांनी तिला ताबडतोब हैदराबाद येथे शिफ्ट केले, परंतु आज पहाटे कोमल आपल्यात न राहिल्याची बातमी समजली आणि धक्का बसला.’

महत्वाच्या बातम्या :-
मोदींनी इतक्या वर्षात 1800 रुपयांची नोट का काढली नाही? व्हायरल काकूनंतर काकांची मागणी
राज्यात तब्बल १४,८८८ रुग्णांची वाढ , एकूण बाधितांचा आकडा ७,१८,७११वर
अनलॉक-4मध्ये राज्यात ‘हे’ सुरू आणि ‘हे’ बंद राहणार , वाचा सविस्तर
कोरोनाचा कहर सुरूच ! पुणे, मुंबई, ठाण्यात पुन्हा वाढू लागले रुग्ण !!
वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे ‘या’ जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून पुन्हा लॉकडाऊनची मागणी
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. तिच्या जाण्यानं उदयनराजे झाले हळवे , शेअर केली भावनिक पोस्ट InShorts Marathi.

कोल्हापुरात तूर्तास कडक लॉकडाऊन करणार नाही – पालकमंत्री सतेज पाटील

Previous article

मोठी बातमी – शिवसेना नेत्याची गोळी घालून हत्या , पत्नी आणि मुलगी जखमी

Next article

You may also like

Comments

Comments are closed.