Royal politicsभारतमहाराष्ट्रमुख्य बातम्या

उदयनराजे भोसले यांचा पंतप्रधानाच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश ?

0

खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाबद्दल सर्वत्र जोरदार चर्चा आहे. मात्र उदयनराजेंच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तारखेवरून नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत सोलापूरमध्ये उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करतील, असं बोललं जात होतं.

मात्र उदयनराजे अमित शहा यांच्या नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत थेट दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती आता सूत्रांकडून मिळाली आहे. जोरदार शक्तीप्रदर्शनासह उदयनराजेंना पक्षात घेण्याचा भाजपचा विचार आहे.

उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. उदनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास राष्ट्रवादी बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे. कारण साताऱ्यासह महाराष्ट्रातील इतर भागातही उदयनराजेंना मानणारा एक मोठा वर्ग आहे.

दहावी फेरपरीक्षेचा निकाल आज जाहीर

Previous article

मुख्यमंत्र्यांना जाब विचारणाऱ्यांना पोलिसांनी उचलले

Next article

You may also like

Comments

Comments are closed.