Royal politicsमहाराष्ट्रमुख्य बातम्या

लीड तोडणारा कोणी असेल तर साताऱ्यातून आपली माघार : उदयनराजे

0

सातारा : ”सगळ्या पक्षांमध्ये माझे मित्र आहेत, मी सातारा लोकसभेसाठी इच्छुक असून माझे लीड तोडणारा कोणी असेल तर आपली माघार असेल,”असे आव्हान साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुंबईतील बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे साताऱ्याचे खासदार उदयनराजेंनी आपण साताऱ्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे स्पष्ट केले .पवारसाहेब जो निर्णय घेतील तो मान्य असेल असेही उदयनराजे यांनी सांगितले. परंतु, शरद पवारांचे जसे सर्वपक्षीय मित्र आहेत तसे आपलेही सर्व पक्षात मित्र आहेत, असा सूचक इशाराही उदयनराजे यांनी दिला.

Loading...

निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबईत सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यास अनेक नेत्यांनी विरोध केला. साताऱ्यातून रामराजे निंबाळकर किंवा दुसरा उमेदवार द्यावा, अशी मागणी या नेत्यांनी केली आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींनंतर शरद पवार उदयनराजेंना पुन्हा उमेदवारी देणार का, उमेदवारी न दिल्यास उदयनराजे दुसऱ्या पक्षात जाणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

उदयनराजेंच्या वाढदिवसला जायचं की नाही राष्ट्रवादीसमोर पेच; शरद पवारांनी घेतली गुप्त बैठक

खासदार उदयनराजे बिनदाढीचे प्रेम चोप्रा ! शिवेंद्रसिंहराजेंचा पलटवार

सकाळपासून लिटरवर असणाऱ्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये

Loading...

‘संजय निरुपम परप्रांतीय भटका कुत्रा’, मनसेची पोस्टरबाजी

Previous article

खा.उदयनराजे भोसले यांना महाराष्ट्र स्वाभिमान,रिपब्लिकन पक्षानंतर आता भाजपची ऑफर

Next article

You may also like

Comments

Comments are closed.