Royal Entertainmentमुख्य बातम्या

तुम्हाला सारखी उचकी लागतेय …. तर मग करा हे घरगुती उपाय आणि झटक्यात ही समस्या सोडवा

0

आपण अनेकदा जेवण करत असताना अन्ननलिकेत अन्न अडकून एकदम उचकी लागत असल्याचे पाहिले असेल. अशी उचकी लागल्यावर आपल्याकडे समज गैरसमज मोठ्या प्रमाणात आहेत.उचकी लागल्यावर आपली कोणीतरी आठवण केली का ? असेदेखील फार पूर्वीपासून आपल्याकडे म्हणण्यात येते.
मग एकेकाचे नाव घ्यायचे आणि अचानक उचकी थांबते आणि अमुक व्यक्तीने आपली आठवण केली म्हणून उचकी लागली, असे सांगण्याचे. मात्र, असे काहीही नसून यामागे वैज्ञानिक कारण असते. अन्ननलिका मध्ये एखादा अन्नाचा कण आल्यास आपल्याला उचकी लागण्याची प्रक्रिया सुरू होते. मात्र, कधीकधी उचकी लागण्याचे प्रमाण हे अधिक प्रमाणात असते.
अनेकांना सातत्याने उचकी लागत असते. त्यावर वेळीच उपाय करणे हे गरजेचे असते. डॉक्टर अनेक वेळेस यावर औषध गोळ्या लिहून देतात. मात्र, तरीदेखील उचकी थांबण्याचे नाव घेत नाही. मात्र, काही उपाययोजना केल्यानंतर उचकी लागण्याचे प्रकार थांबवू शकतात. आम्ही आपल्याला या लेखांमध्ये घरगुती असे उपाय सांगणार आहोत की, जेणेकरून आपण उचकी लागणे थांबवू शकतात.
1) श्वास रोखून ठेवा – आपल्याला अनेकदा उचकी लागण्याचे प्रकार घडत असतात. आपल्याला असा प्रकार नेहमी होत असेल तर आपण दीर्घ श्वास घेऊन थोड्यावेळासाठी श्वास रोखा. त्यानंतर उचकी लागणे हे थांबू शकते. मात्र, उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांनी असे प्रकार करू नये.
2) लिंबू व मध – जर आपल्याला सातत्याने उचकी लागत असेल तर आपण घरगुती उपाय करू शकता. लिंबाचा रस आणि थोडा मध एकत्रित करून हे मिश्रण घ्यावे. यामुळे आपली उचकी थांबू शकते.
3) हळूहळू जेवण करा – जर आपण नेहमीच घाईघाईने जेवत असाल तर असे करू नका. असे केल्यास आपल्याला सातत्याने उचकी लागू शकते. आपण हळूहळू जेवण करून उचकी लागली तर यावर मात करू शकता.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.
The post तुम्हाला सारखी उचकी लागतेय …. तर मग करा हे घरगुती उपाय आणि झटक्यात ही समस्या सोडवा appeared first on Marathi Entertainment.

मराठी अभिनेत्रींनी केली शक्‍तीस्वरूप दुर्गेची उपासना

Previous article

‘या’ कारणामुळे ‘कुली नंबर 1’ चित्रपटाच्या वाढणार अडचणी?

Next article

You may also like

Comments

Comments are closed.