Royal politicsमुख्य बातम्या

गोव्यात नव्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत विश्वजित राणे; कॉंग्रेसच्या दोन आमदारांची भाजप प्रवेशाची शक्यता

0

मनोहर पर्रीकर यांची प्रकृती बिघडल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री बदलणार अशी चर्चा सुरू झाली होती, मात्र भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी नकार दिला होता. आता मात्र मनोहर पर्रीकर यांची प्रकृती बिघाड झाल्यानंतर आता पुन्हा एकदा गोव्याच्या मुख्यमंत्री पद बदलणार अशी चर्चा सुरू झाली आहे. यात कॉंग्रेसच्या 2 आमदार भाजप आज पहाटे भाजप श्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीला गेल्याचे वृत्त आहे.

कॉंग्रेसचे सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे हे दोन आमदार आज दिल्लीत भाजप प्रवेश करण्याची शक्यता आहे. कारण आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे पूर्वी कॉंग्रेसमध्ये होते. ते त्यांचे समर्थक असल्याने ते देखील भाजप प्रवेश करतील अशी शक्यता आहे.

Loading...

मनोहर पर्रीकर दोनापावल येथील त्यांच्या निवासस्थानी आहेत. सध्या २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आले आहे. सत्तेत असलेले इतर घटक पक्षांमध्ये गोव्याचे पर्यायी मुख्यमंत्री कोण असतील, याची चर्चा सुरू झाली आहे.

रविवारी पर्रीकर त्यांची प्रकृती नाजूक होती. पर्रीकर मंत्री किंवा आमदारांना भेटू शकलेले नाहीत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर व सरचिटणीस तानावडे यांनी सोमवारी पर्रीकर यांची भेट घेतली.

गोवा फॉरवर्डचे नेते मंत्री विजय सरदेसाई यांनी गोव्याचे नवे मुख्यमंत्री आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी व्हावे म्हणून पाठिंबा दिला आहे. परंतू मगोपचे मंत्री सुदीन ढवळीकर यांची त्यांना मंजुरी नाही. सरकारमधील तीन मंत्री 17 किंवा 18 ऑक्टोबरला दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शहा यांना भेटून राजकीय स्थिती त्यांच्यासमोर ठेवणार आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सोमवारी राष्ट्रपतींच्या कार्यालयाला आपले निवेदन सादर केले असून, काँग्रेसला सरकार स्थापनेची संधी द्यावी, परस्पर विधानसभा सुरू करू नये, अशी मागणी केली आहे. काँग्रेसकडे 16 आमदार असल्याने तो गोव्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. यामुळेच भाजप कॉंग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे हे दोन आमदार भाजपच्या गळाला लागले आहेत.

गोव्यात सध्या भाजपाचे 13 आमदार आहेत. ही विधानसभा 40 जागांची असून सत्तास्थापनेसाठी 21 जागांची आवश्यकता आहे.

Loading...

दोन झुंजार नेत्यांची भेट …चर्चा तर होणारचं

Previous article

नवरात्री स्पेशल : लहान गरीब मुलांसाठी ‘ती’ करते सढळ हाताने मदत, केला नोकरीचा त्याग!

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *